नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केट सुरु राहणार आहे. शेअर मार्केट उघडताच आज स्टॉक्समध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. शेअर मार्केटची सुरुवात आज सावध गतीने झाली आहे.
आज शेअर मार्केट उघडताच निफ्टी २० अंकाच्या वर उघडला आहे. तर सेन्सेक्स ५० अकांच्या आधी उघडला आहे. सध्या शेअर मार्केट संथ गतीने सुरु आहे. निफ्त २३५०० च्या वर व्यव्हार करत आहे तर सेन्सेक्स २०० वर व्यव्हार करत आहे.
आज शेअर मार्केटमध्ये दबाव दिसत आहे. तर सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे.RVNL मध्ये ५ टक्के वाढ होताना दिसत आहे.IRB मध्ये ५ टक्क्यांनी वाढ होत आहे. माझगाव डॉक,BDL, एनएचपीसीच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे.
आज शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपच्या शेअर्समध्येही वाढ होताना दिसत आहे. अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांनी वाढ होत आहे. अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये३.५२ टक्क्यानी वाढ होताना दिसत आहे. तर अदानी इंटरप्रोयजेजच्या शेअर्समध्ये २.४६ टक्क्यांनी वाढ होताना दिसत आहे.
दरम्यान, आज शेअ मार्केट उघडताच BSE सेन्सेक्सच्या टॉप ३० शेअर्समध्ये ९ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. NSE च्या ५० शेअर्समध्ये आयटीसी हॉटेल्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बेल, अल्ट्राटेत सिमेट या शेअर्समध्ये ३ टक्क्यांनी वाढ दिसत आहे. तर एनएसई टॉप ५० शेअर्समधील २३ शेअर्समध्ये घसरण झाली आहे.