spot_img
अहमदनगर‘सिस्पे’च्या आरोपींमध्ये केंद्रस्थानी ‘अण्णा’?; सुजय विखे कोणत्याही क्षणी भांडाफोड करण्याच्या तयारीत

‘सिस्पे’च्या आरोपींमध्ये केंद्रस्थानी ‘अण्णा’?; सुजय विखे कोणत्याही क्षणी भांडाफोड करण्याच्या तयारीत

spot_img

सारिपाट / शिवाजी शिर्के
जादा परताव्याचे अमिष दाखवून नगर शहरासह पारनेर, श्रीगोंदा तालुका आणि पुणे व नगर जिल्ह्यातील हजारो गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा टाकणार्‍या सिस्पे आणि इन्फीनीटी या कंपनीचे संचालक परागंदा झालेत. या कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना खर्‍या अर्थाने गंडा घालण्याचे काम कंपनीचे संचालकांपेक्षा पारनेर तालुक्यातील मातब्बर नेत्याच्या कुटुंबातील ‘अण्णा’ने केल्याचे आता समोर आले आहे. पोलसि तपासात अण्णा आणि त्याचे काही साथीदारांची नावे स्पष्टपणे समोर आल्यानेच आता या सार्‍यांना बेड्या पडणार असल्याचा दावा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे करत आहेत. दरम्यान, याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देखील दुजोरा दिल्याने कोट्यवधींच्या या घोटाळ्यात मोठा हायड्रोजन बाँब फुटणार हे नक्की! फक्त हा बाँब दिवाळीेपूर्वी फुटणार की दिवाळीनंतर याबाबतची उत्सुकता आहे.

सिस्पे आणि इन्फीनीटीसह अन्य बोगस कंपन्यांच्या माध्यमातून शेअर ट्रेडींगच्या नावाखाली अगस्त्य मिश्रा, नवनाथ औताडे व त्यांच्याशी संलग्न असणार्‍या संचालकांवर नगरसह पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. सदर प्रकरणी काहींना अटकही झाली. सुपा परिसरातील गाडीलकर बंधूंनी कोट्यवधींना गंडा घातल्याचे स्पष्ट झाले. याच गाडीलकर याच्या माध्यमातून सुपा परिसरासह नगर तालुका, श्रीगोंदा आणि पारनेरच्या ग्रामीण भागातून हजारो गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपये सिस्पेसह इन्फीनीटीमध्ये गुंतवले. कंपनीकडून परतावा मिळणे बंद झाल्यानंतर गाडीलकर याच्या विरोधातच गुंतवणुकदारांनी तक्रारी केल्या. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता गाडीलकर याच्या बँक खात्याद्वारे आर्थिक उलाढाल झाल्याचेही समोर आले.

गाडीलकर याच्यामुळे गुंतवणुकदारांना गंडा बसला असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक जोरकसपणे फिरवली. त्यात धक्कादायक बाब समोर आली. त्याच्या खोलात पोलिस गेले असता पारनेर तालुक्यातील मातब्बर नेत्याच्या कुटुंबातील एका नेत्याचा भाऊच याचा मास्टरमाईंड निघाल्याचे समोर आले. ‘अण्णा’ या टोपण नावाने ओळखल्या जाणार्‍या नेत्याच्या भावामुळेच आम्ही गुंतवणूक केल्याचे आणि त्यातून आमची फसवणूक झाल्याचे जबाब काहींनी पोलिसांकडे नोंदविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

‘त्यांचा’ पापाचा घडा भरला, पळून जाता येणार नाही ः डॉ. सुजय विखे पाटील
सिस्पे आणि इन्फीनीटीमध्ये जादा परताव्याचे अमिष दाखवून गंडा घालणार्‍यांमध्ये सो- कॉल्ड गरीबांचा मसीहा आणि त्याचे कुटुंबीयच असल्याची बाब आता पोलिस तपासात समोर आली आहे. त्यांच्या पापाचा घडा भरलाय आणि त्यातून त्यांना कारवाईला सामोर जावेच लागणार आहे. पारनेरसह श्रीगोंद्यातील अनेकांना गंडविणार्‍यांवर कारवाई होणारच! गुंतवणुकदारांना फाट्यावर मारणारा कोणी कितीही मोठा असला तरी आता त्याला पळून जाता येणार नाही इतका बंदोबस्त पोलिसांनी आताच करुन ठेवला असल्याची प्रतिक्रिया डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलीय.

तगाद्याला कंटाळून पतीची आत्महत्या!
माझे पती श्याम चव्हाण यांनी इन्फिनिटी मध्ये जवळपास ३२ लाख रुपये गुंतवले होते. माझ्या पतीमुळे अनेक मित्र मंडळींनीही औताडे याच्याकडे लाखो रुपये गुंतवणूक केली होती. मात्र सर्वांची फसवणूक करत तो पळून गेला. ज्यांनी पैसे गुंतवले होते ते माझ्या पतीकडे मागणी करत असत. तुझ्यामुळे आम्ही पैसे गुंतवले आहेत, तूच पैसे आम्हाला दे असा वारंवार तगदा लावत होते. त्याला सार्‍याला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केली. आमचा संसार उघड्यावर आला आहे. माझी मुले बेवारस झाली आहेत. – रचना चव्हाण (मृत श्याम चव्हाण यांच्या पत्नी)

अण्णासोबत पारनेरमधील पहिल्या फळीची टोळी!
गुंतवणुकदारांना जास्त परतावा देण्याचे अमिष औताडे- मिश्रासह यांच्यासह कथीत अण्णा आणि त्याच्यासोबत असणार्‍या पारनेर तालुक्यातील पहिल्या फळीतील सहा- सात जणांनी दाखवले असल्याचेही समोर आले आहे. सिस्पेचा घोटाळा समोर येण्याच्या काही दिवस आधी नवनाथ औताडे याला अण्णा व त्याच्या चार साथीदारांनी उचलून आणल्याचे आणि त्याला ‘प्रसाद’ दिल्याची बाब देखील तपासात समोर आली आहे. आता या सार्‍यांनाच रेकॉर्डवर घेतले जाणार असल्याचा दावा पोलिस अधिकार्‍याने केलाय.

राजकारणालाच कलाटणी मिळणार!
सामान्यांचा आधारवड, सामान्य कुुटुंबातील चेहरा म्हणून गेल्या काही वर्षात चर्चेत आलेल्या कुटुंबातील सदस्याचेच नाव कोट्यवधींच्या घोटाळ्यात समोर आल्याने पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्ह्याच्याच नव्हे तर संपूर्ण राज्याच्याच राजकारणाला कलाटणी मिळणार यात शंका नाही. ‘आमचा संबंध नाही, गुंतवले गेले’, असा कांगावा करण्यास देखील यात संधी राहिलेली नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचे मत आहे.

परताव्याच्या आमिषाचा पहिला बळी श्रीगोंद्यात; पुण्यात एकाची आत्महत्या
सिस्पे आणि इन्फिनिटी बिगन यांसारख्या कंपन्यांच्या मोठ्या परताव्याच्या अमिषाला बळी पडून गुंतवणूक केलेल्या अनेक नागरिकांचे कोट्यवधी रुपये बुडाल्याची गंभीर समस्या समोर आली आहे. श्रीगोंदा तालुयातील रहिवाशी असलेले श्याम चव्हाण हे कामानिमित्त कुटुंबासह पुण्यात वास्तव्यास होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी दापोडी परिसरात फाशी घेऊन आपले जीवन संपवले. श्याम चव्हाण यांनी ३२ लाख रुपये या कंपन्यांत बुडाल्याने आत्महत्या केली. चव्हाण हा सिस्पेतील मोठ्या परताव्याच्या अमिषाचा पहिला बळी ठरला!

प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज!
गुंतवणूक केलेले पैसे परत मिळवण्यासाठी चव्हाण यांनी कंपन्यांशी संबंधित अगस्त मिश्रा आणि नवनाथ अवताडे यांच्याशी वारंवार संपर्क साधला होता, मात्र त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि पैसे परत मिळाले नाहीत. श्याम चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...