spot_img
अहमदनगरअहमदनगर : कचरा डेपोत अनागोंदी कारभार? 'सहा' स्वच्छता निरीक्षकांची चौकशी होणार, नेमकं...

अहमदनगर : कचरा डेपोत अनागोंदी कारभार? ‘सहा’ स्वच्छता निरीक्षकांची चौकशी होणार, नेमकं प्रकरण काय,पहा..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
बुरुडगाव येथील कचरा डेपोतील अनागोंदी कारभार व कचरा विलगी करणासाठीची मशीनरी चार वर्षांपासून उपलब्ध नसल्याचे समोर आल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक पंकज जावळे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सहा स्वच्छता निरीक्षकांनी दिलेले खुलासे अमान्य करत त्यांच्यावर गैरव्यवहार, अनियमीतता व बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

डेपोतील १०० टन क्षमतेच्या खतनिर्मिती प्रकल्पात तीन प्रकारच्या कचरा विलगीकरणासाठी वापरल्या जाणार्‍या मशीनरी नसल्याचे समोर आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत ही विलगीकरण होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यावर प्रशासक जावळे यांच्या आदेशानुसार विभाग प्रमुख सहाय्यक आयुक्त सपना वसावा यांनी सहा स्वच्छता निरीक्षकांना नोटीसा बजावल्या होत्या.

त्यात आलेले खुलासे असमाधानकारक असल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार किशोर देशमुख, परिक्षित बिडकर, प्रशांत रामदिन, अविनाश हंस, बाळू विधाते, राजेश तावरे यांच्यावर गैरव्यवहार, अनियमीतता व बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रभारी उपायुक्त सपना वसावा यांची चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी म्हणून मेहेर लहारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Sujay vikhe patil : ‘विखे कुटुंबीयांचे योगदान जनता विसरणार नाही, विखेंनाच निवडून देतील’

राहुरी / नगर सह्याद्री Sujay vikhe patil : विखे कुटुंबीयांनी गेली तीन पिढ्यापासून जिल्ह्यासाठी...

मंदिरचा चौथरा पाडला, ग्रामस्थ आक्रमक; नगर तालुक्यातील ‘या’ गावात घडला प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री नवनागापूरमध्ये छत्रपती नगर परिसरात आठ महिन्यापूर्वी लोकवर्गणीतून ओपन स्पेसमध्ये बांधलेले शनी...

सुजय विखेंच्या रॅलीत झळकले संदीप कोतकरांचे बोर्ड…

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ कोतकर यांची भव्य बाईक रॅली अहमदनगर | नगर...

Ahmednagar crime : अतिक्रमणावरून गौरी घुमट परिसरात राडा

अहमदनगर | नगर सह्याद्री Ahmednagar crime : अतिक्रमण काढण्यावरून गौरी घुमट परिसरात दोन गटात हाणामारीची...