spot_img
ब्रेकिंगMaratha reservation: २४ तारखेनंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल! मनोज...

Maratha reservation: २४ तारखेनंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल! मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
Maratha reservation:मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) पाचव्या टप्यातील दौर्‍याला सुरवात करत आहेत. या दौर्‍यानिमित्त त्यांनी बोलताना मराठा समाजाला जो संघर्ष करावा लागत आहे तो कुठं तरी थांबला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे.

सरकार आणि मुख्यमंत्री काय मांडतात त्याचा निर्णय २४ तारखेनंतर होणार आहे. त्यामुळे २४ तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होणार असल्याचा इशारा मनोज पाटील जरांने पाटील यांनी (Manoj Jarange Patil) सरकारला दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे. यावर विरोधी पक्षाकडून आचारसंहिता लागणार असल्याने विशेष अधिवेशन कसं बोलवणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका तर झाल्या पाहिजे ना? त्यामुळे आचासंहिता लागणार कशी? असा सवाल उपस्थित केला आहे.

२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणारच, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री यांच्यावर समाजाने विश्वास टाकला त्यांच्या शब्दाचा सन्मान केला. आता त्यांनी समाजाचा सन्मान करावा. त्यांनी काल आरक्षणाचा विषय पटलावर मांडला त्यात एक दोन शब्द ते विसरले त्या बाबत ही ते स्पष्ट करतील, असं जरांगे पाटील म्हणाले.

सरकार सरकारचे काम करत आहे. आम्ही आमचे काम सुरूच ठेवले आहे. मागचे अनुभव आणि घोषणा पाहता आम्ही उड्या मारणार नाही. जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणू जे न पटणारं असेल त्याला विरोध करू. त्यामुळे सरकार आणि मुख्यमंत्री काय मांडतात त्याचा निर्णय २४ तारखेनंतर होणार आहे. त्यामुळे २४ तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होणारच असल्याचा इशारा, मनोज पाटील जरांने पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...