spot_img
अहमदनगरParner News: खून का बदला खून ! आजीच्या खूनाचा बदल्यामुळे गाव हादरले

Parner News: खून का बदला खून ! आजीच्या खूनाचा बदल्यामुळे गाव हादरले

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
पारनेर तालुयातील चोंभूत येथील चोरमले वस्तीवर शनिवारी सायंकाळी जावयाने सासूच्या डोयात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती. हा खून करणार्‍या जावयाचा त्याच्याच पोटच्या मुलाने खून करून आजीच्या खुनाचा बदला घेतल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाष संतोष शेंडगे यास अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली.

पती-पत्नीच्या वादावरून जावई संतोष दौलत शेंडगे (रा. शिरसुले, ता. पारनेर) यांनी सासू राधाबाई महादू चोरमले (रा. चोंभूत) यांच्या डोयात दगड घालून खून केला. राधाबाई यांचा खून झाल्याचे समजल्यानंतर मेंढ्यांच्या वाड्यावर असलेल्या संतोष व बानुबाई यांचा मुलगा सुभाष तिथे आला. आजी राधाबाईच्या डोयात दगड घातल्याने तिचा मृत्यू झाला असतानाही संतोष शिवीगाळ करीत असल्याने संतप्त झालेल्या सुभाष यांनी तिथे असलेले लाकडी दांडयाने वडील संतोष यांच्या डोयात मागील बाजूस मारले.

त्यामुळे जखम होऊन संतोष यांच्या डोयातून रक्तस्त्राव सुरू झाला व तो जागेवरच कोसळला.राधाबाई यांच्या डोयात दगड घातल्याने त्या पडवीमध्ये मृत अवस्थेत असताना सुभाष शेंडगे याचा राग अनावर झाल्याने त्याने वडील संतोष यांच्या डोयात लाकडी दांडयाचा प्रहार केला. पोलीस आल्यानंतर राधाबाई व संतोष यांना रुग्णवाहिकेतून पारनेरच्या रुग्णालयात नेले. तेथे राधाबाई यांना मृत घोषित केले तर संतोष यास पुढील उपचारासाठी नगरला हलविले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा सोमवारी मृत्यू झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...