श्रीगोंदा। नगर सहयाद्री
भ्रष्टाचारा विरोधात कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसाठी अॅड. सुमित बोरुडे यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. अनोख्या मागणीसाठी वकील तरुणांनी सुरू केलेल्या या उपोषणाची शहरात चांगलीच चर्चा होत आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्यासह पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये चाललेल्या भ्रष्टाचार बाबत वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही होत नाही. भ्रष्टाचारात एक सूत्रता रहावी व नागरिकांनी पोलिसांना द्यावी लागणारी भ्रष्टाचाराची नेमकी रक्कम समजणे सहज शक्य व्हावे यासाठी एक दरपत्रक लावावे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशन कायद्याचे रक्षण करण्याऐवजी भक्षण करत आहे. तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट चालू आहे. पोलीस स्टेशनच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली केली असून कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.