spot_img
देशलोकसभेपूर्वी राजकीय भूकंप? 'बड्या' मंत्र्यानी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

लोकसभेपूर्वी राजकीय भूकंप? ‘बड्या’ मंत्र्यानी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

spot_img

नवी लिद्ली | वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना हरियाणामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हरियाणातील सत्ताधारी भाजपा व जेजेपी यांच्यातील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे.

ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत थेट मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या राजीनाम्यासाठी दोन्ही सत्ताधारी पक्षांमधील लोकसभा निवडणूक जागावाटप कारणीभूत ठरल्याचे बोललं जात आहे. मनोहर लाल खट्टर व त्यांच्या मंत्र्यांनी आज सकाळी त्यांच्या पदाचा राजीनामा सादर केला.

विशेष म्हणजे हरियाणा मंत्रीमंडळाचा विस्तार बर्‍याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. भारतीय जनता पक्ष व जननायक जनता पार्टी या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आधी मंत्रीमंडळ विस्तार व नंतर लोकसभेसाठीचं जागावाटप यावरून टोकाचा विसंवाद झाल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, हरियाणातील आगामी मंत्रीमंडळ विस्तारामध्ये मोठे फेरबदल होणार, अशी चर्चा आहे. यामध्ये जेजेपी पक्षाच्या एकाही आमदाराला मंत्रीपद देण्यात आलेलं नसून भाजपा अपक्ष आमदारांचा सरकारसाठी पाठिंबा घेऊ शकते. त्यासाठी काही अपक्षांना मंत्रीपदही दिलं जाण्याची शयता आहे.

जागावाटपाचा तिढा!
दरम्यान, भाजपा व जेजेपी या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकासाठीच्या जागावाटपाबाबत तिढा निर्माण झाला होता. यासंदर्भात जेजेपी नेते व उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सोमवारी दिल्लीत भेट घेतली असता त्यावेळी त्यांना हरियाणामध्ये एकही जागा दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे जेजेपीची दोन जागांची मागणी असताना भाजपानं मात्र सर्व १० जागा लढवण्याची तयारी केली आहे. जेजेपीला हरियाणातील हिसार व भिवानी-महेंद्रगड लोकसभा मतदारसंघ हवे होते. मात्र, भाजपानं सर्व जागा लढवणार असल्याचं पक्षातील वरीष्ठांना कळवलं आहे. तसेच, संभाव्य उमेदवारांची यादीही भाजपाकडून तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...