spot_img
अहमदनगरआ. निलेश लंकेंची पसंती कोणाला? थोरल्या की धाकल्या पवारांना?, पण...निवडणुकीवर ठाम

आ. निलेश लंकेंची पसंती कोणाला? थोरल्या की धाकल्या पवारांना?, पण…निवडणुकीवर ठाम

spot_img

शरद झावरे | नगर सह्याद्री
आगामी लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये विखे विरुद्ध लंके असा सत्ता संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या महायुती मध्ये सहभागी असलेले आमदार नीलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आपली पसंती थोरल्या की धाकल्या पवारांना देतात याकडेही जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे सोमवारी दिवसभर आमदार लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा दिवसभर चालू होती.

परंतु या भेटीचा आमदार लंके यांनी इन्कार करत मी पुणे येथील विश्रामगडावर खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली. नगर येथील शिवपुत्र संभाजी राजे महानाट्य नंतर माझी त्यांच्याशी भेट न झाल्याने याविषयी चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे सांगून त्यांनी सध्या तरी या प्रवेशाबाबत हात झटकले आहे. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या आग्रहातर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगून आमदार लंके पती-पत्नी आपल्या निर्णयावर ठाम आहे.

त्यामुळे सध्या तरी महायुतीच्या सरकारची आमदार नीलेश लंके यांच्या भुमिकेमुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डोकेदुखी वाढली आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर तर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांनी सुद्धा आपल्या चिन्हाबाबत निर्णय गुलदस्त्यात ठेवत लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आमदार लंके हे प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची चर्चा व विचारविनिमय करून याबाबत लवकरच अधिकृत निर्णय घेणार असल्याची माहिती समजली आहे. तर दुसरीकडे भाजपचे अनेक नेते आमदार लंके यांच्या संपर्कात असून लोकसभा निवडणुकीत विखे पिता -पुत्रांच्या विरोधात सर्वतोपरी रसद पुरवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या लंके विरुद्ध विखे या लढतीमध्ये अधिक रंगत निर्माण झाले आहे.

विखे विरुद्ध लंके लक्षवेधी लढत?
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खा. सुजय विखे पाटील यांनी विविध सामाजिक व राजकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकसभेची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजपची यादी जाहीर नसली तरी खा.सुजय विखे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केली आहे. तर याच मतदारसंघात भाजपाकडून आ. राम शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भानुदास बेरड यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. विखे हेच भाजपचे उमेदवार असतील असे गृहीत धरता आ. लंके यांनी विखे विरोधात उमेदवारीची तयारी चालविली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. आ. लंके हे घरवापसी करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विखे यांच्या विरोधात उमेदवारी करणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली जातेय,
दादांची साथ सोडू नका ः आ. मिटकरी
आमदार नीलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. आ. लंके यांच्या निर्णयानंतर अजित पवार गटाकडून त्यांना परत यावं अशी साद घालण्यात येत आहे. पारनेरचे आमदार आणि अजित पवारांचे विश्वासू समजले जाणारे आ. लंके यांनी त्यांची साथ सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. लंके यांनी घेतलेला हा निर्णय अजित पवार गटाला चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसतंय. लंके साहेब, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली जातेय, दादांची साथ सोडू नका असं भावनिक आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केल आहे. तसेच सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी आमदार रोहित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केल्याचे दिसून येत आहे.

विखे पिता-पुत्र की लंके पती-पत्नी रिंगणात
आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमधून भाजपाकडून खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नसल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा आता झडू लागली आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी आपल्या पत्नी सौ. राणीताई लंके यांना रिंगणात उतरण्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू केली आहे. तर दुसरीकडे समर्थकांनी थेट आमदार नीलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीची गळ घातली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत विखे पिता पुत्र की लंके पती-पत्नी रिंगणात उतरणार आहेत याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादीचे राजेंद्र फाळके यांचा भाऊ- पुतण्यासह नरेंद्र फिरोदिया व प्रतिष्ठीतांवर फसवणूक, ऍट्रासीटीचा गुन्हा

आदिवासी समाजाची जमिन फसवणूक खरेदी करणे व विक्री करणे भोवले अहमदनगर | नगर सह्याद्री आदिवासी भिल्ल...

शरद पवार शुक्रवारी नगरमध्ये; लंके यांच्या संवाद यात्रेचा समारोप; ‘या’ दिवशी नीलेश लंके अर्ज दाखल करणार!

अहमदनगर | नगर सह्याद्री महाविकास आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या संवाद यात्रेचा...

आमदार निलेश लंकेंसाठी फाळके-कळमकर यांची केमिस्ट्री!; थोरातांचेही बळ! लंके प्रतिष्ठानची स्वतंत्र यंत्रणा निर्णायक…

मतदारसंघात प्रतिष्ठानचे आतापासूनच स्वतंत्र अस्तित्व | संवाद यात्रा निर्णायक टप्प्यावर! सारीपाट / शिवाजी शिर्के लोकसभा निवडणुकीसाठी...

जिल्हा बँकेचा ‘त्या’ शेतकऱयांना दिलासा! घेतला मोठा निर्णय, ‘ते’ व्याज २२ एप्रिलपर्यंत जमा करणार

माजी मंत्री, चेअरमन शिवाजी कर्डीले यांची माहिती अहमदनगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा...