spot_img
ब्रेकिंगमहामार्गावर मोठा अपघात..? रस्तारोको करत संतप्त नागरिकांनी केली ‘मोठी’ मागणी

महामार्गावर मोठा अपघात..? रस्तारोको करत संतप्त नागरिकांनी केली ‘मोठी’ मागणी

spot_img

पाथर्डी | नगर सह्याद्री
राष्ट्रीय महामार्ग ६१ या महामार्गावर पोळा मारुती मंदिराजवळ अपघातांचे प्रमाण वाढले असून काल संध्याकाळी एक मोठा अपघात झाल्याने संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले.

दि. ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी अभय राकडे यांनी गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून ६१ या राष्ट्रीय महामार्गावर जुना खेरडा फाटा ते मारुती मंदिर परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे दिवसातून एक अपघात गतिरोधक नसल्यामुळे या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी तत्काळ गतिरोधक बसावेत अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा करूनही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केले जात होते. मात्र काल संध्याकाळी एक मोठा अपघात या ठिकाणी झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सकाळी ११ वाजता वंचित बहुजन आघाडीचे नेते अरविंद सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत रस्ता रोको आंदोलन केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष भोरू मस्के, महिला आघाडीचे अध्यक्ष रोहिणी ठोंबे, सामाजिक कार्यकर्ते बबलू वावरे, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष आप्पासाहेब बोरूडे, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे, भाजपाचे माजी नगरसेवक रमेश गोरे, बंडू बोरुडे, देविदास शिंदे, संतोष फलके, सुनील जाधव, बाळासाहेब गिरी, पारूबाई थोरात, आदी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी अभय राखडे, यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायदे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर गुप्त वार्ता विभागाच्या भगवान सानप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! 3 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा तर ‘या’ सात जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसणार

Maharashtra Weather: राज्यात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर काही...

अहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर…

Crime News : देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171...

आजचे राशी भविष्य! तुमच्या नशिबात काय?, वाचा सविस्तर

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही...

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...