Politics News: राजकीय वर्तुळात पुन्हा राजकीय बॉम्ब फुटणार असल्याची चर्चा पसरली आहे. विधानसभा निवडणुकीआधी बीआरएसचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली आहे. ‘राष्ट्रवादी’ शरद पवार गटामध्ये महाराष्ट्रातील बीआरएस पक्ष विलीन होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यावेळी के चंद्रशेखर राव यांनी स्वतः नागपूरमध्ये येऊन स्वतःच्या पक्षाच्या कार्यलयाचे जल्लोषात उद्घाटन केले होते. राज्यातील नेत्यांनी पक्ष प्रवेश देखल केला होता. मात्र आता महाराष्ट्रात त्यांच्या पक्ष गाशा गुंडाळण्याचा तयारीत असल्याचं दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीआधीच बीआरएसचे पदाधिकारी शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील.राज्यातील बीआरएस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक देखील शरद पवार यांच्यासोबत पार पडली असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 6 तारखेला पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करतील, असं सूत्रांचं म्हणणं आहे.