spot_img
अहमदनगरअहमदनगर जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; 'ते' उमेदवार पात्र ठरणार...

अहमदनगर जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; ‘ते’ उमेदवार पात्र ठरणार की अपात्र…?

spot_img

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

अहमदनगर / नगर सह्याद्री : जिल्हा खरेदी व्रिकी संघाच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट पहावयास मिळत आहे. जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये नगर तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जावर महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण म्हस्के यांनी हरकत दाखल केली आहे. तसेच त्यावर सुनावणी होऊन निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. हा निकाल सहा वाजता दिला जाणार असल्याने निकालामध्ये ते उमेदवार पात्र की अपात्र होतात याकडे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये नगर तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून विलास राधाजी शिंदे, अरुण संपतराव म्हस्के, श्रीकांत रंगनाथ जगदाळे, महेंद्र प्रकाश शेळके, सचिन सुभाष लांडगे या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवारची शेवटची मुदत होती.

आलेल्या अर्जांची शुक्रवारी छाननी झाली. दरम्यान उमेदवार अरुण म्हस्के यांनी अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था, मर्या. या संस्थेचे ३१ मार्च २०२३ पूर्वी शेअर्स रक्कम कोणत्या उमेदवाराच्या सहकारी सेवा सोसायटी संस्थेने पूर्ण केलेली आहे अशा उमेदवाराचा शुद्धीपत्रानुसार अर्ज पात्र करावा. ज्यांची शेअर्सची रक्कम अपूर्ण आहे अशांचा अर्ज अपात्र करावा अशी हरकत दाखल केली.

त्यावर नगर तालुका उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सुनावणी होऊन प्रत्येकास म्हणणे मांडण्यास संधी दिली. तसेच निकाल राखून ठेवण्यात आला आहे. सहा वाजता निकाल दिला जाणार असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. या निकालामध्ये हरकत घेतलेले उमेदवार पात्र होतात की अपात्र हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

…तर कोर्टात जाणार ः अरुण म्हस्के
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी १५ जानेवारी २०२४ रोजी काढलेल्या शुद्धीपत्रकामध्ये निवडणुकीसाठी सर्वसाधारण जागेसाठी उभे राहणार्‍या प्रतिनिधीची पात्रता तो ज्या वि.का.से.सोसायटीचा सभासद असेल त्या संस्थेने ३१ मार्चपूर्वी संस्थेचे कमीत कमी २५ शेअर्स भाग खरेदी केलेले असले पाहिजे हा निकष आहे. या पात्रतेमध्ये माझा एकमेव अर्ज पात्र होत आहे. संबंधित अधिकार्‍यांवर पुढार्‍यांचा दबाव असून ते उमेदवार अपात्र असूनही पात्र झाले तर कोर्टात जाणार असल्याचे अरुण म्हस्के यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना सांगितले.

हरकत फेटाळली
अहमदनगर जिल्हा कृषि औदयोगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्या. अहमदनगर या संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षीक निवडणुक सन २०१६-१७ ते २०२१-२२ करीता या मध्ये ही उपविधी क्र. ३७ मध्ये नमुद केलेल्या प्रमाणे एकुण २५ भाग खरेदी बाबतच्या हरकती येवुन त्यानुसार नामनिर्देशन पत्र फेटाळण्याबाबत हरकत आल्या होत्या. परंतु निवडणुक निर्णय अधिकारी यांनी हकरत फेटाळण्यात आली होती. निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या निकालाविरोधात हरकतदार हे उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे रिट पिटीशन दाखल केले होते. सदरचे रिट पिटीशन क्र.१०७३५/२०१६ मध्ये मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी हरकतदार यांचा दावा फेटाळून निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम ठेवलेला आहे.
हरकती व म्हणण्यांचा विचार केला असता अहमदनगर जिल्हा कृषि औदयोगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्या. अहमदनगर या संस्थेने या पुर्वी व सहकार कायदयामध्ये ९७ वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर आदर्श उपविधी स्विकारल्यानंतर उपविधी क्र.३७ मध्ये नमुद केलेल्या प्रमाणे एकुण २५ भाग खरेदी करण्याबाबत सभासदांना लेखी कळविले नाही तसेच सदर संस्थेच्या यार्षीक सर्वसाधारण सभेच्या सभा नोटीस दि.१३/०९/२०२१ ही जाहीर वृत्तपत्रात प्रसिध्द करुन त्यामध्ये उपविधी क्र.३७ मध्ये नमुद केलेल्या प्रमाणे एकुण २५ भाग खरेदी करणे बाबत टिफ न देता फक्त १० भाग खरेदी केले पाहिजे अशी टिप देवुन जाहीर प्रकटन दिलेले आहे. व रिट पिटशन क्र.१०७३५/२०१६ मधील निकालाचे अवलोकन केले असता शिंदे विलास राधाजी, जगदाळे श्रीकांत रंगनाथ, शेळके महेंद्र प्रकाश, लांडगे सचिन सुभाष यांचे नगर तालुका सर्वसाधारण प्रतिनिधी या मतदार संघातील नामनिर्देशन पत्र नामंजुर करणे उचित होणार नाही. आपली हरकत फेटाळण्यांत येत आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी गोंड यांनी हरकतदार अरुण म्हस्के यांना कळविले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...