spot_img
महाराष्ट्रशिक्षण क्षेत्रातील बदलांसाठी शिक्षकांचे सहकार्य गरजेचे : आ.तांबे

शिक्षण क्षेत्रातील बदलांसाठी शिक्षकांचे सहकार्य गरजेचे : आ.तांबे

spot_img

नंदुरबार / प्रतिनिधी : शिक्षक हा सरकारी शिक्षण व्यवस्थेतील खूप महत्त्वाचा घटक आहे. सरकारला शिक्षण व्यवस्थेत कोणताही बदल आणायचा असेल तर तो शिक्षकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे सरकारने शिक्षकांच्या मागण्या गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करत विशिष्ट कालावधीत तोडगा काढला पाहिजे, अशा भावना आमदार सत्यजीत तांबेंनी व्यक्त केल्या.

आ. सत्यजित तांबे यांनी गुरुवारी नंदुरबार येथील जिल्हा परिषद येथे प्राथमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत शिक्षक बदली, पदोन्नती व वेतनवाढी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या वेळी हे प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश आ. तांबेंनी दिले.

भरती करण्याआधी जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करावी, शिक्षक पती व पत्नी यांची नेमणूक एकाच ठिकाणी करावी, मुख्याध्यापक हे पद पदोन्नतीने भरण्यात यावे, शालार्थ प्रणालीचे मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात यावे, सातवा वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हफ्ता जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना मिळावा, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन निधी अभावी होत नाही ते वेतन नियमित व्हावे आदी प्रमुख प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी, मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम रघुवंशी, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, वेतन अधीक्षक प्रमोद पाटील, उपशिक्षणाधिकारी अनिस पठाण, संघटनेचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...