spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली पिस्तुलची गोळी, आयसीयुमध्ये उपचार सुरु, नक्की प्रकरण...

धक्कादायक! अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली पिस्तुलची गोळी, आयसीयुमध्ये उपचार सुरु, नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्यासोबत दुर्दैवी प्रकार घडला आहे. त्यांच्या स्वतःच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली. त्यामुळे गोविंदा जखमी झाले आहेत. घटनेत गोळी त्यांच्या पायात शिरली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदा सकाळी पाच वाजताच्या सुमारास घराबाहेर पडताना या दुर्घटनेचा सामना करावा लागला. त्यांच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे. घरात एकटे असताना त्यांनी बंदूक साफ करताना चुकून गोळी झाडली, जी थेट त्यांच्या पायात लागली.

त्यानंतर गोविंदा यांना क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, आणि त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया देखील पार पडली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या प्रकरणी आता जुहू पोलिसांनी त्याची बंदूक ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरु आहे. याबद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडिया व्हायरल होतानादेखील दिसत आहेत. दरम्यान हा प्रकार नक्की कसा घडला याबद्दल तर्क-वितर्क मांडण्यात येत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...