spot_img
अहमदनगरAhmadnagar Breaking: भर रस्त्यात 'द बर्निंग कारचा' थरार..! प्रवाशांसोबत घडलं असं काही..

Ahmadnagar Breaking: भर रस्त्यात ‘द बर्निंग कारचा’ थरार..! प्रवाशांसोबत घडलं असं काही..

spot_img

भाळवणी । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील भाळवणी – जामगाव रोडवर भाळवणी पासून एक किलो मीटर अंतरावर असलेल्या सबस्टेशन नजीक विना नंबरची मारुती कार रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडक देऊन पलटी झाल्याने काही वेळातच पेट घेतल्यामुळे नागरिकांना ‘द बर्निंग कारचा’ थरार पाहावयास मिळाला. ही घटना आज मंगळवार दि. ७ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे.

अधिक माहिती अशी की, सदरची कार भाळवणीहून जामगावच्या दिशेने जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सदरची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून साईड गटारीमध्ये पलटी झाली. यानंतर काही वेळातच गाडीने पेट घेतला. गाडी विझविण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे.

वाहनामध्ये तीन मुले व एक मुलगी असल्याचे समजले. यातील मुले व एक मुलगी गाडीची काच फोडून बाहेर आल्याने ते बालंबाल बचावले. हे सर्वजण घाबरल्याने घटनास्थळापासून पसार झाले यामुळे त्यांची नावे समजू शकले नाहीत. या घटनेच्या आवाजाने नजिकच्या घरातील नागरिक भयभीत झाले तसेच घटनास्थळावर नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...