spot_img
अहमदनगरखा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून 'इन्कार'

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री:-
मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात कोठेही निधी देऊ शकतो. पुणे हे माझे होम ग्राऊंड आहे. आमचे मंत्री गिरीष महाजन यांना पत्र लिहून अथवा आमचे पुण्याचे नियोजन अधिकारी यांना पत्र लिहून मी निधी देऊ शकतो. नगरच्या जिल्हाधिकार्‍यांना मी पत्र देण्याचा प्रश्नच नाही. याशिवाय २५१५ चा जीआर अद्याप आलेला नाही. पारनेरमध्ये नीलेश लंके यांच्या मागणीनुसार निधी देण्याचा प्रश्नच नाही. पारनेरमध्ये भाजपाचे मोठे युनीट आहे, आमचे कार्यकर्ते तेथे आहेत. त्यांच्या मागणीनुसार मी निधी देऊ शकतो, असा खुलासा भाजपाचे विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना केला.

‘खा. नीलेश लंके यांना भाजपाची मोलाची साथ’ या मथळ्याखाली ‘नगर सह्याद्री’मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. त्या वृत्तानुसार भाजपाचे विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर यांनी पारनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यासाठीचे पत्र दिल्याचे म्हटले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच त्याचे पडसाद थेट मुंबईत उमटले. खा. लंके यांनी त्यांचे व्यक्तीगत संबंध वापरुन पारनेरसाठी निधी मिळविल्याबद्दल पारनेरकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. राजकीय मतभेद बाजूला ठेवत खा. लंके हे निधी आणून कामे मार्गी लावत असल्याबाबतही समाधान व्यक्त झाले.

दरम्यान, याच वृत्ताच्या अनुषंगाने भाजपाचे आमदार टिळेकर यांनी आपण असे कोणतेही पत्र नीलेश लंके यांना अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले नसल्याचे स्पष्ट केले. पारनेरमधील भाजपा कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पत्र दिल्याचे आ. टिळेकर यांनी म्हटले आहे. मात्र, तालुक्यातील भाजपा पदाधिकार्‍यांनी असे पत्र आ. टिळेकर यांच्याकडे मागीतलेच नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्वीस्ट समोर आला आहे.

आ. टिळेकर खोटं बोलतात: कोरडे
पारनेरमध्ये भाजपाचे मोठे संघटन आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने विकास कामे मंजूर करणे आणि त्यासाठी निधी मिळवणे यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नशिल असतो. तालुक्यातील विकास कामांना निधी मिळावा अथवा त्या कामांना मंजूरी मिळावी यासाठी आम्ही कोणीही आ. योगेश टिळेकर यांच्याकडे पत्र दिले नाही आणि मागणी देखील केलेली नाही. तालुक्यातील भाजपा कायकर्त्याच्या मागणीनुसार पत्र दिले असे जर ते बोलले असतील तर ते धादांत खोटे बोलत असल्याचे स्पष्टीकरण भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिले.

आमची मागणीच नाही: राहुल शिंदे
केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने आणि पारनेर तालुक्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भक्कम असल्याने आम्ही अन्य कोणाकडे निधी मागण्याचा अथवा तसे पत्र मागण्याचा प्रश्नच नाही. देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आम्ही कामे मार्गी लावत आलो आहोत आणि यापुढेही कामे होणार आहेत. त्यामुळे विधान परिषद सदस्य टिळेकर यांच्याकडे निधीची मागणी करणारे अथवा विकास कामांची मागणी करणारे कोणतेही पत्र पारनेर तालुका भाजपाने दिले नसल्याचा निर्वाळा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ! हत्या की आत्महत्या? पती-पत्नीचा ‘तसल्या’ अवस्थेत आढळला मृतदेह..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील गोगलगाव (ता. राहाता) येथे गुरुवारी एका पती-पत्नीचा संशयास्पद...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना’अच्छे’ दिन? वाचा, भविष्य..

मुंबई / नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल-त्यामुळे तुमच्या कुटुंबातील...

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...