spot_img
ब्रेकिंगवस्ताद नवा डाव टाकणार! भाजपच्या 'बड्या' नेत्याला शह देण्यासाठी शरद पवारांनी मोहरा...

वस्ताद नवा डाव टाकणार! भाजपच्या ‘बड्या’ नेत्याला शह देण्यासाठी शरद पवारांनी मोहरा शोधला? ‘तो’ नेता ‘तुतारी’ हाती घेणार..

spot_img

Politics News: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी (भाजप) आणि महायुती विरोधात तगडी रणनीती आखली आहे. अशातच आता शरद पवार यांनी भाजपचे नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी तगडा उमेदवार शोधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली गिरीश महाजनांविरोधात तगडा उमेदवार निवडण्याचे ठरवले आहे. भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे.

दिलीप खोडपे हे जळगाव जिल्ह्यात प्रभावशाली मराठा नेता मानले जातात आणि जामनेर मतदारसंघात १ लाख ४० हजार मराठा मतदार आहेत. त्यामुळे शरद पवारांनी गिरीश महाजनांविरोधात मराठा कार्ड खेळण्याची रणनिती आखली आहे, असे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे.

शिवस्वराज्य यात्रा २१ तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार असून, या यात्रेदरम्यान खोडपे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार स्वतः या प्रसंगी उपस्थित राहणार असून, यामुळे जळगावमध्ये तुतारी विरुद्ध कमळ असा हायहोल्टेज सामना होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...