spot_img
अहमदनगर४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

spot_img

डॉ. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्याचे आवाहन
अहमदनगर | नगर सह्याद्री
PM Narendra modi : ४ जून ही इंडिया आघाडीची एसपायरी डेट असून त्यानंतर या आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी मिळणार नाही, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच काँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले, असेही ते म्हणाले. नगरमधील महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली.
श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र ज्यांनी दिला त्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनाही कोटी कोटी अभिवादन करतो. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रचार सभेला मराठीतून सुरुवात केली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नगरमध्ये आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, माजी मंत्री मधुकर पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार अशुतोष काळे, आ. मोनिका राजळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, राष्ट्रवादीच्या अनुराधाताई नागवडे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भानुदास बेरड, बाबुसाहेब टायरवाले, विक्रम पाचपुते यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसची बी टीम अ‍ॅटिव्ह झाली असून सीमेच्या पलीकडून ट्विट केले जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्या बदल्यात काँग्रेसचे नेते पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यातून लीन चीट देण्याचे काम करत आहेत. मुंबईमध्ये झालेला २६/११ चा हल्ला पाकिस्तान ने केलेला हल्ला होता. आपल्या जवानांना दहशतवाद्यांनी शहीद केले होते. आपल्या निर्दोष नागरिकांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. हे सर्व जगाला माहिती आहे. न्यायालयाने देखील या विषयावर निर्णय दिला आहे. इतकच नाही तर पाकिस्तानने देखील दहशतवादी हल्ला झाल्याचे मान्य केले आहे. या दहशतवाद्यांचे फोन रेकॉर्ड उपलब्ध आहेत. असे असताना काँग्रेस पक्षाचे नेते आता दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र जाहीर करत आहेत. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य अतिशय धोकादायक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आता काँग्रेस पक्षातील नेते आतंकी कसाबची बाजू मांडत असल्याचे मोदी यांनी सांगित विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. मुंबई हल्ल्यातील सर्व निर्दोष नागरिकांचा अपमान आहे. हा मुंबई हल्ल्यात सर्व दहशतवाद्यांना मारणार्‍या सुरक्षा दलाचा हा अपमान आहे. शहीद तुकाराम वांजळे सारख्या सर्व शहिदांचा हा अपमान असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काँग्रेस देशाला कोणत्या बाजूला घेऊन जात आहे? असा प्रश्न देखील नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. तुष्टीकरण करण्याच्या नादात काँग्रेस आपली पातळी खाली आणत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. अशा काँग्रेसला महाराष्ट्रात एक देखील जागा मिळायला नको, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस आणि त्यांचे सहकारी खतरनाक खेळ खेळत असल्याचे मी अनेक दिवसापासून सांगत होतो. आता इंडिया आघाडीच्या एका मोठ्या नेत्याने या खतरनाक खेळावरुन पडदा काढला आहे. जो नेता आताच तुरुंगातून बाहेर आला आहे. तो नेता म्हणजे लालूप्रसाद यादव असून त्यांनी देशात इंडिया आघाडीचे सरकार आले मुस्लिमांना आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले असल्याचे मोदींनी म्हटले आहे. इतकेच नाही तर ते मुस्लिमांना पूर्ण आरक्षण देणार असल्याचा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला असल्याचे मोदी म्हणाले.


वास्तविक देशात एससी, एनटी, ओबीसी या समाजाकडे पूर्ण आरक्षण आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडी हे पूर्ण आरक्षण काढून मुसलमान समाजाला देणार असल्याचे सांगत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या माध्यमातून केवळ स्वत:च्या मतदारांना खुश करण्याचे काम इंडिया आघाडी करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. जे काम करण्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थांबवले होते तेच काम त्यांना करायचे असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास संविधानाने मनाई केली आहे. तरी देखील ते संविधान बदलायचे असल्यामुळेच अशा पद्धतीने आरक्षण देण्याची भाषा काँग्रेस करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
निवडणुकीच्या पूर्वी जो भानुमतीचा कुणबा एकत्र आला होता. हा कुणबा ४ जून नंतर वाळूच्या किल्ल्याप्रमाणे संपणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावेळेस निवडणूक ही संतुष्टीकरण आणि तृष्टीकरण यांच्या दरम्यान होत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एनडीए मेहनतीच्या माध्यमातून संतुष्टीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे इंडि आघाडीचे नेते तृष्टीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला जाहीरनामा हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा असल्याचा दावा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि एनडीएतील घटक पक्षातील जाहीरनाम्यात कोणते मुद्दे देण्यात आले आहेत, विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, देशाचा सन्मान हे सर्व एनडीएच्या जाहीरनाम्यातील मुद्दे असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यातील एकाही मुद्द्यावर काँग्रेस बोलत नसल्याचा आरोप नरेंद्र मोदी केला आहे.

काँग्रेसने ५० वर्ष गरिबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले होते. गरिबांसोबत काँग्रेसने सर्वात मोठा विश्वासघात केला असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याला विरोध केला होता. त्या जाती आधारीत आरक्षण देण्याची भाषा काँग्रेस करत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे अहिल्यादेवी नगरकरांच्यावतीने अभिनंदन करतो. दरम्यान, कुकडी व साकळाई योजनेचे काम ात्काळ सुरु करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच अहमदनगर जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडविण्याची मागणीही त्यांनी केली. तिसर्‍यांना पंतप्रधान मोदी यांना करण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील व सदाशिव लोखंडे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी खा. सदाशिव लोखंडे, आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची भाषणे झाली.

नगर, शिर्डीच्या उमेदवारांचा विजय निश्चित ः देवेंद्र फडणवीस
नगरमध्ये निरंकारी भवन मैदानाजवळ तिसर्‍यांदा सभा होत आहे. पहिल्या दोन सभांचे रेकॉर्ड या सभेने मोडले आहेत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील, शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा विजय निश्चित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून कुकडी, साकळाईचे पाणी मिळणार आहे. तसेच जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे. जिल्ह्यात चार एमआयडीसी मंजुर केल्या आहेत. त्यामुळे येथील तरुणांना रोजगार, गरजुंच्या हाताला काम मिळेल. शेतकर्‍यांना चोवीस तास वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सोलर योजना, शेतकर्‍यांना दिवसा बारा तास वीज देणार आहोत. शिर्डी, नगरचा चेहरा बदलत आहे. तिसर्‍यांना मोदींना पंतप्रधान करण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

तिसर्‍यांदा मोदीच पंतप्रधान होतील अन्
नगरमध्ये विखे पाटीलच खासदार होणार
अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार असून ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. चार जूनला जेव्हा मतपेट्या उघडतील तेव्हा तिसर्‍यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील. तसेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील हेच खासदार होतील असा विश्वास खा. विखे पाटील यांनी व्यक्त केला. तसेच जेथे जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेतात. तेथील विजय निश्चित होतो असेही ते म्हणाले. या मैदानावर तिसर्‍यांना सभा होत आहे. तिसर्‍यांना मोदींना पंतप्रधान करायचे आहे. आणि माझा अनुक्रमांकही तीन आहे. विरोधकांकडे विकासाचे कोणतेची व्हिजन नाही. त्यामुळे तिसर्‍यांना नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील. तसेच अहमदनगरमध्ये डॉ. सुजय विखे हेच खासदार होतील असा विश्वास खा. विखे यांनी व्यक्त केला.

खा. विखे पाटील यांना एक नंबरचे लीड मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नगरमधील सभेमुळे जिल्ह्यातील जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. २०१४, २०१९ प्रमाणे आता २०२४ मध्येही देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहे. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने मोठी विकास कामे केली आहेत. तसेच खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात एक नंबरचे लीड महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील मिळेल असा विश्वास आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विखे, लोखंडे यांना विजयी करा ः आ. शिंदे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाचा भरीव विकास झाला. तसेच अहमदनगर जिल्ह्यातही मोदी सरकारच्या माध्यमातून मोठी विकास कामे झाले आहेत. मोदी यांनी आपल्या कामातून देशाचे नाव उज्वल केले आहे. तिसर्‍यांना मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजय करण्याचे आवाहन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...