spot_img
अहमदनगरAhmednagar News : अबब ! लाखोंच्या मुद्देमालासह 'तो' अट्टल चोर जेरबंद, नगर...

Ahmednagar News : अबब ! लाखोंच्या मुद्देमालासह ‘तो’ अट्टल चोर जेरबंद, नगर पोलिसांनी थेट रायगडातून आवळल्या मुसक्या

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल मोबाईल चोर ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून दीड लाखांचे २ आयफोन व १ विवो कंपनीचा फोन जप्त केला आहे. ज्ञानेश्वर तुकाराम जाधव (वय ४३ वर्षे, रा. विणेगांव, जि. रायगड) असे आरोपीचे नाव आहे.   

अधिक माहिती अशी : शुभम कुंडलिक वाफारे (वय २२ वर्षे, रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली होती की, २५ जानेवारीस ट्रान्सपोर्टची गाडी घेऊन मुंबई येथे जात असताना त्यांचा कंटेनर केडगाव बायपास, अहमदनगर या ठिकाणी नादुरुस्त झाला होता. त्यावेळी चोरट्याने फिर्यादी व त्यांचे मित्राचे  २ अॅपल कंपनीचे फोन, व १ विवो कंपनीचा फोन चोरून नेला होता.

कोतवाली पोलिसांत या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ संदीप पवार, पोना/रविंद्र कर्डिले, भिमराज खर्स, पोकों/अमृत आढाव आदींचे   पथक तयार करुन पथकास आरोपीचा शोध घेण्याबात सूचना देऊन रवाना केले. तांत्रिक विश्लेषणाचे आधारे  वरील आरोपीने चोरी केल्याचे समोर आले. पथकाने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी खालापूर, जि. रायगड येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“राष्ट्रपती महोदया, आम्हाला खून करण्याची परवानगी द्या…” ‘त्या’ पत्राने उडाली खळबळ

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे राष्ट्रपतींना धक्कादायक पत्र मुंबई /...

डागळली : पोलिसांची खाकीवर्दी अन्‌‍ मास्तरांची शाळाही!

हवालदार कसला नामचीन गुंडाच | संदीप चव्हाण हा तर पोलिस दलाचा काळीमाच | भुजबळ...

‘टाकळी’ चंदन तस्करीचे केंद्रबिंदू! कोटीचा कंटेनर मास्टरमाईडच्या आदेशाने दोन लाखांसाठी धावला…

पारनेर | नगर सह्याद्री रक्तचंदनाची कंटेरमधून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन चंदन तस्करांना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर...

‌‘मनीमॅक्स‌’ च्या नावाखाली संदीपने घातला साडेआठ कोटींना गंडा!

पारनेर | नगर सह्याद्री:- मनीमॅक्स फायनान्सीअल ॲडव्हायझर प्रा. लि. ही कंपनी कंपनीच्या माध्यमातून जादा परतावा...