spot_img
देशकेंद्रात नोकरी करण्याची संधी ! 12 हजारांपेक्षा अधिक जागा

केंद्रात नोकरी करण्याची संधी ! 12 हजारांपेक्षा अधिक जागा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आली आहे. थेट केंद्रात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे तब्बल १२ हजार पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असून भरती प्रक्रियेची अधिसूचना पुढील काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल.

थेट आयकर विभागात नोकरी करण्याची ही संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची माहिती ही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली आहे. रोकड जप्तीचे प्रमाण वाढले असल्याने ही मोठी भरती राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची पद्धत ही आॅनलाईनच असणार. लवकरच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही तुम्हाला आयकर विभागाच्या वेब साईटवर मिळेल. काही दिवसांपूर्वीच आयकर विभाग मुंबई यांच्यातर्फे देखील एक भरती प्रक्रिया राबवण्यात आली.

या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत. मात्र, आता जी भरती राबवली जाणार आहे, ती भरती प्रक्रिया खरोखरच मोठी म्हणाली लागेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...