spot_img
अहमदनगरडागळली : पोलिसांची खाकीवर्दी अन्‌‍ मास्तरांची शाळाही!

डागळली : पोलिसांची खाकीवर्दी अन्‌‍ मास्तरांची शाळाही!

spot_img

हवालदार कसला नामचीन गुंडाच | संदीप चव्हाण हा तर पोलिस दलाचा काळीमाच | भुजबळ हा मास्तरांच्या जमातीची किड!
सारिपाट / शिवाजी शिर्के
नगर शहरातील शांत आणि सुशिक्षीत, उच्चभ्रूंची वस्ती म्हणजे सावेडी उपनगर. मात्र, गेल्या काही वर्षात ही ओळख पुसते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून उपनगरात गँगवार सुरू झाल्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. घरासमोरुन एका तरुणाला उचलून नेले जाते, त्याच्या सोबत आणखी दुसऱ्याला. उचलून थेट एमआयडीसी हद्दीतील केकताईच्या वनात! तेथे त्याला अमानुष मारहाण! मारहाण करताना फोटो- व्हिडीओ काढले जातात. हे सारे होत असताना ज्याने कायद्याचा हिसका दाखवायचा आणि त्या माजुरड्यांना आवर घालण्याचे काम करायचे तो संदीप चव्हाण नामक पोलिस कर्मचारी विकृतीचा कळस करत त्यांना साथ देत राहिला. संदीप चव्हाण सारख्या नालायक आणि गुन्हेगारांना पोसणाऱ्या अवलादी पोलिस दलातून फेकून देण्याची गरज आहे. खाकी वर्दीबद्दल शंका, वाईट चर्चा होते ती फक्त आणि फक्त अशा संदीप चव्हाण सारख्या नालायकांमुळेच! दुसरीकडे समाज ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो त्या गुरुजींना बदनाम करण्याचे काम भुजबळ नामक मास्तरने केले. रुई छत्रपती (पारनेर) येथील अल्पवयीन मुलींशी अश्लिल चाळे करतानाच हा मास्तर पकडला गेला. या संपूर्ण प्रकरणात चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असली तरी पालकांनी बघ्याची भूमिका न घेता गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

संदीप चव्हाण याचे निलंबन नको, त्याला सहआरोपी करा!
‌‘दादा, सोन्याला आणलेय, त्याचा बेतच पाहतो आता आम्ही‌’, असा सांगावा एमआयडीसी पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून काम करणाऱ्या संदीप चव्हाण याला राहुल पाटील या म्होरक्याकडून मिळाला. यानंतर चव्हाण याच्यातील पोलिस जागा होण्याणी गरज होती आणि त्याने याबाबत वरिष्ठांना माहिती देत घटनास्थळी धाव घेण्याची गरज होती. प्रत्यक्षात त्याने तसे केले पण गुंडांच्या स्टाईलने! चव्हाण घटनास्थळी गेला. राहुल पाटीलच्या गुंडांना भेटला आणि मारहाण चालू असताना त्यांना अटकाव न करता वैभव नाईकवाडीला मारहाण करतानाचे फोटो काढत बसला. पोलिस म्हणून जे कर्तव्य करायचे ते तो विसरला नाही तर त्याने जाणिवपूर्वक तसे केले. त्यामुळे संदीप चव्हाण याचे निलंबन न होता त्याला या संपूर्ण प्रकरणात सहआरोपी करण्याची हिंमत तोफखान्याचे पोलिस अधिकारी दाखवतील का?

कोणाच्या क्रेटा गाडीत बसून राहुल पाटील फिरला?
घटना घडली त्या दिवशी आणि त्यानंतरच्या दोन दिवस राहुल पाटील हा गँगमास्टर याच संदीप चव्हाण याच्या क्रेटा गाडीत बसून फिरताना अनेकांनी पाहिला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या आवारात तर त्या दिवसात राहुल पाटील आणि संदीप चव्हाण अनेक तास सोबत होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर संदीप चव्हाण पोलिसींग करताना सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करत असतो की गुंडांना भेटत असतो हेच स्पष्टपणे समोर येईल.

एसपी साहेब, तोफखान्याकडून न्याय देताना भेदभाव का?
निंबळक गावातील कोतकरांच्या किराणा दुकानावर सात- आठ जणांनी हल्ला केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारहाण, लुटमार करताना सात- आठ दिसत होते. कोतकरांनी दाखल केलेल्या फिर्यादीतही तसेच होते. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी कणखर भूमिका घेतली आणि ही मारहाण चालू असताना त्या टोळीतील जे- जे गुंड- मवाली बाजूला उभे होते, बाईकवर बसून होते त्या सर्वांना आरोपी केले. त्याची गरजच होती. एसपी साहेब, वैभव नाईकवाडी याला मारहाण चालू असताना आणि त्याचा जीव जात असताना बाजूला राहुल पाटील उभा होता, तुमचा पोलिस हवालदार संदीप चव्हाण उभा होता! मग, त्यांना तोफखाना पोलिसांनी सहआरोपी का केले नाही याचे उत्तर आता तुम्हालाच द्यावे लागणार आहे.

राहुल पाटील गँगचा म्होरक्या तरीही मोकाट!
वैभव (सोनू) नाईकवाडी याच्या हत्याकांडातील आरोपी पकडले असले तरी या गँगचा म्होरक्या संदीप पाटील हा असल्याचे जाहीर आहे. संपूर्ण सावेडी उपनगरात त्याची चर्चा असताना तोफखाना पोलिस ठाण्यातील नाईकवाडी खून प्रकरणात त्याला आरोपी का केले गेले नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. राहुल पाटील आणि संदीप चव्हाण नामक पोलिस कर्मचारी हे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. या दोघांचे कॉल डिटेल्स काढल्यास हे दोघे कशासाठी एकमेकांच्या संपर्कात होते हे समोर येणार आहे.

तोफखान्याचा कारभार जावयांच्या बडदास्तीसाठी!
सावेडी उपनगरात सर्वाधिक दहशत आणि गँग तयार होत असताना गेल्या दोन वर्षात येथे दहा बारा खून पडले आहेत. त्यातील आरोपींचा शोध अद्यापही लागलेला नाही. मस्साजोग हत्याकांडाला लाजवेल असे हत्याकांड नगरमध्ये घडले आणि त्याचे फोटो देखील समोर आले. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड राहुल पाटील असल्याचेही समोर आले असताना त्याला आरोपी करण्यात आले नाही. यातील आरोपी पकडले असल्याचा दावा करणाऱ्या तोफखाना पोलिसांना राहुल पाटील याचा सहभाग कसा दिसून येत नाही हाच सावेडीकरांना पडलेला प्रश्न आहे. राहुल पाटील तोफखान्याच्या ठाणेदारांचा जावई आहे काय आणि असेलच जावई तर त्याच्या पुरणपोळीची सोय कोणी केली, त्याचे मीठ तोफखान्यातील कोणता कारभारी खातो याचा शोध पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घेण्याची गरज आहे.

मास्तरांच्या संघटना अन्‌‍ नेत्यांच्या मुलींबाबत असे घडले असते तर?
जळगावच्या यात्रेत खडसे ताईंच्या मुलींची छेड काढण्याची घटना घडली. प्रकरण पोलिसात गेले. लागलीच पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले आणि आरोपींना ताब्यात घेत त्यांना बेड्या ठोकल्या! अशा कितीतरी मुलींची छेड राजरोस काढली जाते, त्याही पोलिसात येतात! त्यांच्याबाबत ही भूमिका घेतली जाते का या प्रश्नाचे उत्तर समाज सध्या शोधत आहे. मात्र, रुई छत्रपती येथील भुजबळ मास्तरने सामान्यांच्या कुटुंबातील मुलींशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडून चार दिवस उलटले तरी मास्तरांच्या संघटना, त्यांचे नेते मूग गिळून बसलेत? त्यांच्याच मुलींवर असा प्रसंग आला असता तर? मास्तर मंडळींनो, तुम्ही पाठीशी कोणाला घालत आहात! भुजबळ सारख्या वासनांधाला पाठीशी घालणार असाल तर समाज तुम्हा नेतेमंडळींना माफ करणार नाही हे नक्की!

मास्तरांच्यातील हे हैवान कुठपर्यंत पोसणार?
समाज ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो त्या गुरुजींनी सामाजिक भान जपले पाहिजे, असे जेव्हा बोलले जाते किंवा लिहीले जाते तेव्हा, मास्तरांच्यातील काही नेते मंडळी उपहासाने लागलीच ‌‘आदर्शाचे सारे नियम आम्हीच पाळायचे का?‌’ असं उत्तर देतात आणि दाताड काढून बत्तीशी दाखवतात! मात्र, भुजबळ सारखे हैवान जेव्हा जन्माला येतात तेव्हा काय करायचे? सारेच मास्तर असे आहेत असेही नाही! मात्र, जनतेने, विद्यार्थ्यांनी आदर्श नक्की कोणाचा घ्यायचा याचेही भान जपण्याची गरज आहे.

‌‘त्या‌’ पालकांनी भानावर येण्याची गरज!
रुई छत्रपती (पारनेर) येथील अल्पवयीन मुलींचे शोषण झाले असताना त्या मुलींचे पालक पोलिसात यायला तयार नाहीत. त्यांना त्यांच्या मुलींची काळजी आणि कुटुंबाची जाहीर वाच्यता होण्याची भिती वाटते. मात्र, मग यामुळेच भुजबळ सारख्या नालायक, वासनांध प्रवृत्तीचे फावते! त्यामुळे रुई छत्रपतीमधील पालकांनी सामाजिक भान जपण्याची गरज आहे. आज आपल्या मुलींशी चाळे करणारा हा भुजबळ उद्या अन्यत्र बदलून जाईल आणि तिथेही त्याची वासनांधता जागी होईल! त्यामुळे त्याला कायद्याची जरब बसवायचीच असेल तर पालकांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.

चमकोगिरी करण्यापेक्षा गुन्हा दाखल करण्यास पुढे या!
झालेला प्रकार निंदणीय आहेच. त्यातील दोषीचे नाव आमच्याही समोर आले आहे. मात्र, ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे, त्यांच्या पालकांनी पुढे यावे. लागलीच गुन्हा नोंदवू आणि दोषीला बेड्या ठोकू. त्याच्या सात पिढ्यांच्या लक्षात राहील अशी भूमिका आम्ही घेऊ. मात्र, हे सर्व करण्यासाठी कोणीतरी पुढे येण्याची गरज आहे. या प्रकरणात चमकोगिरी करण्यापेक्षा संबंधितांनी पालकांचे समुपदेशन करावे. आम्ही आमची भूमिका चोखपणे पार पाडू!
– सोमनाथ दिवटे (सहा. पोलिस निरीक्षक, सुपा पो. स्टे.)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...