spot_img
राजकारणभाजपचा हिंदुत्ववादी चेहरा कॅसिनो खेळतोय? ट्विटमधील फोटोमुळे संपूर्ण राजकारणात खळबळ

भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा कॅसिनो खेळतोय? ट्विटमधील फोटोमुळे संपूर्ण राजकारणात खळबळ

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : राजकरणात विविध घडामोडी घडत असतात. परंतु आता एका घटनेने राजकरणात खळबळ उडाली आहे. ते ही एका ट्विट केलेल्या फोटोमुळे. फोटोत जुगार खेळणारी व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

पहा नेमके काय घडलेय?
खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केलाय. याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. संजय राऊत यांनी एका कॅसिनोमधील फोटो ट्विट केलाय. या फोटोमधील व्यक्तीने एका रात्रीत 3.50 कोटी रुपये कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात, असा दावा संजय राऊतांनी केलाय.

“हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?”, असा सवाल संजय राऊत यांनी या ट्विटद्वारे केला आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली असून आता भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

भाजपकडून स्पष्टीकरण
“आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही.

आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?”, असा सवाल करत भाजपने संजय राऊतांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...