spot_img
अहमदनगरहीच खरी शिक्षक संघटना, पद्मभूषण अण्णा हजारे असे का म्हणाले... वाचा सविस्तर

हीच खरी शिक्षक संघटना, पद्मभूषण अण्णा हजारे असे का म्हणाले… वाचा सविस्तर

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री – कोरोना काळात जी मूले पोरके झाली त्या पोरयांना दिवाळीच्या निमित्ताने आर्थिक आधार देऊन रोहकले प्रतिष्ठानने खरे समाजभान जपले आहे. त्यामुळे रावसाहेब रोहकले प्रतिष्ठानने पोरंयांना शैक्षणिक आर्थिक आधार देत खरी शिक्षक संघटनेची वंचिताची दिवाळी साजरी केली असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले आहे.

राळेगणसिद्धी येथील ट्रेनिंग सेंटर मधील सभागृहात वंचितांची दिपावली उपक्रमात आई-वडील नसलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मदतनिधी आणि दिवाळी फराळ वाटपाच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमासाठी रावसाहेब रोहोकले गुरुजी, जेष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, पारनेरचे गटशिक्षणाधिकारी आर.टी. केसकर, भाऊसाहेब डेरे गुरुजी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्टीमध्ये एकत्र येऊन कोरोना काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील दगावलेले आहेत. अशा अनाथ विद्यार्थ्यांसाठी मदत निधी गोळा करून त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश देण्याचे काम केलं हीच खरी त्या वंचिताच्या जीवनामध्ये दिपावली आहे. रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून शिक्षकांचा वंचिताची दिवाळी उपक्रम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पद्मभूषण हजारे यांनी काढले.

हजारे म्हणाले, शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक आहे आणि त्यांचं काम समाजासाठी फार मोठं काम आहे. वंचितांची दिपावली ह्या अनाथांसाठी मदत करण्याच्या उपक्रमातून अनेकांनी प्रेरणा घेऊन देश, राज्य, गाव उभे राहण्यासाठी निश्चित मदत होणार आहे. खरं तरी जो स्वतःसाठी जगतो तो कायमचा मरतो आणि जो दुसर्‍यासाठी मरतो तो कायमचा जगतो उक्तीप्रमाणे या शिक्षकांनी जे काम केलेलं आहे ते निश्चित समाजाला दिशादर्शक आहे. अनाथांना त्यांच्या जीवनामध्ये आशावाद निर्माण होईल.

अण्णा हजारे यांनी रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रतिष्ठाणच्या आणि शिक्षकांच्या भावी कार्याला शुभेच्छा देत असेच मोठं काम यापुढील काळात करावे अशी अपेक्षा व्यक्त करून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी शिक्षक नेते प्रविण ठुबे, सुनिल दुधाडे, अविनाश निंभोरे, नानासाहेब बडाख, बाबा पवार, गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचबरोबर ज्ञानेश्वर इंगळे, संतोष खोमणे, बाबासाहेब धरम, राजेंद्र पोटे, शिवाजी कोरडे, संदीप सुंबे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

जिल्ह्यांतील १५० विद्यार्थ्यांना मदतनिधीचे वाटप ः जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी प्रथमेश मच्छिंद्र वाबळे घाणेगाव, संग्राम सुभाष करंजुले पाडळी रांजणगाव, धनश्री ज्ञानदेव गुंजाळ दैठणे गुंजाळ, खुशी अनिल दुधवडे जवळे, श्रेयस रामदास कर्डीले वडनेर हवेली, ओम तुकाराम केदार, प्रिया कुशाबा दुधवडे गोडसेदरा, ओम नवनाथ काळे, अनुष्का नवनाथ काळे, मंथन सचिन चारुडे अस्तगाव, अनुज गणेश वाघोले केडगाव, सोहम सतीश बोरुडे निंबळक, पायल सदाशिव लोंढे रायगव्हाण यांना प्रातिनिधिक स्वरूपात डॉ अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते मदतनिधी आणि दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळेतील १५० विद्यार्थ्यांना रावसाहेब रोहोकले गुरुजी सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने मदतनिधी वाटप करण्यात येणार आहे.

उपक्रमामुळे अण्णांचे अनुयायी
डॉ. अण्ण हजारे तसेच रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्यासारखी माणसे दिपस्तंभासारखे समाजात कार्य करत असून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात व यातूनच प्रेरणा घेऊन नविन पिढीतील अनुयायी तयार होणे आवश्यक आहे. -डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...