spot_img
ब्रेकिंगDiwali 2023: आज धनत्रयोदशी! झाडू खरेदीला का आहे महत्त्व?

Diwali 2023: आज धनत्रयोदशी! झाडू खरेदीला का आहे महत्त्व?

spot_img

नगर सहयाद्री टीम-

हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाची दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी आहे. दिवाळी सणाला धनत्रयोदशीपासून सुरुवात होते. भारतीय संस्कृतीत दिवाळी आणि दिवाळीतील पाच दिवसांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हा त्यातील एक महत्वाचा दिवस आहे. दिवाळीतील प्रत्येक दिवसाशी निगडित अनेक परंपरा आहेत.

धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो. संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, यामुळे संपत्तीचा देव कुबेर प्रसन्न होतो आणि आपल्यावर धनाचा वर्षाव होतो.

या दिवशी धन आणि समृद्धीसाठी भगवान गणेश, भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आयुर्वेदाचे हिंदू देव, भगवान धन्वंतरी यांचीही धनत्रयोदशीला पूजा केली जाते. असे मानले जाते की, भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते.

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी वैशिष्टयपूर्ण पूजा असते. या दिवशी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते. शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा, या उद्देशाने दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळीच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह झाल्याची पौराणिक कथा सुद्धा आहे. याशिवाय या दिवशी राम वनवासातून घरी परतले होते त्यामुळे दिवाळीला दिवे लावून आनंद साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत दिवाळी आणि दिवाळीतील पाच दिवसांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हा त्यातील एक दिवस. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी वैशिष्टयपूर्ण पूजा असते. या दिवशी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते.

का केली जाते झाडूची पूजा?

झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते. याशिवाय घरातून गरिबीही दूर होते. दिवाळीला झाडू खरेदी करण्याबाबत आणखी एक समज आहे की, असे केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडत नाही. यासोबतच काही लोकांचा असाही विश्वास आहे की, या दिवशी घरात झाडू आणल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मकता पसरते. स्वच्छता ही देवी लक्ष्मीला आकर्षित करते असे म्हटले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...

ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करणाऱ्या कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज : मंत्री विखे पाटील

निघोज / नगर सह्याद्री ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करीत कन्हैया दूध उद्योग समूहाच्या माध्यमातून...

डॉ. अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले चुकीचा अर्थ लावून…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर...

पाणी आणणे म्हणजे एमआयडीसीत ठेकेदारी करणे नव्हे; मंत्री विखेंचा खा. लंकेंना सूचक टोला

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खा. लंकेंना टोला | कान्हूर पठार येथे मंत्री विखेंचा...