spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांना मोठा दिलासा! मंत्रिमंडळात घेतला मोठा निर्णय

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मंत्रिमंडळात घेतला मोठा निर्णय

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-

राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आराखड्यात नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ९६ महसुली मंडळांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

नुकत्याच मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून उर्वरित गावांच्या बाबतीत जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल मागवून या गावांबाबतही निर्णय केला जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. अनेक तलाव आजही कोरडेठाक आहेत. कोणत्याच धरणात पुरेसा पाणी साठा नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे. दरम्यान, पालकमंत्री विखे पाटील यांनी सरकारकडे यासाठी पाठपुरावा केल्याने जिल्ह्यातील दुष्काळी महसूल मंडळांना न्याय मिळणार आहे.

नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ९६ गावांचा समावेश आता दुष्काळी गावांच्या यादीत झाल्याने या गावांना जमीन महसूल घट, पिक कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलाच्या वसुलीत स्थगिती शालेय व महाविद्यालयीन फी माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पाण्याचे टॅकर्स आशा सवलती तातडीने लागू करण्याता निर्णय बैठकीत घेण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज, चिमुकल्या परीसह घरी परतले ‘माता-पिता’

Deepika Padukone: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला आज (रविवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दीपिका...

एसटी महामंडळाचा ‘मोठा’ निर्णय; ‘लालपरी’ मध्ये अडचण आल्यास करा ‘हे’ काम!

मुंबई : नगर सह्याद्री:- प्रवाशांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला...

नागरिकांमध्ये मोठी नाराजी; ‘त्या’ रस्त्यावर अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला, कडक कारवाई होणार?

Maharashtra News: आळंदी पुणे रस्त्यावरील वाढते हॉटेल-लॉज आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला परिसरात दिसत...

मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार दोन दिवसांत राजीनामा’; ‘भाजपने नवा ‘फॉर्म्युला’ तयार केला..

Politics News: दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली...