spot_img
राजकारणमराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, उद्यापासूनच...

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, उद्यापासूनच…

spot_img

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई | नगर सह्याद्री

पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्र वाटपास मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. शिंदे समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. शिंदे समितीकडे उपलब्ध डेटानुसार सरकार प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करणार आहे. समितीकडे उपलब्ध पुराव्यानुसार प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सोमवारी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. त्यात न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. राज्यभरात मराठा कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदीबाबत समिती आढावा घेत होती. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. उद्या तहसीलदारांची बैठक घेऊऩ जुन्या नोंदी सापडलेल्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याच्या सूचना केल्या जातील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात तहसीलदारांची बैठक उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतील. यामध्ये जुन्या नोंदी सापडलेल्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याच्या सूचना केल्या जातील.

शिंदे समितीने एक प्रथम अहवाल सादर केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारून पुढील प्रक्रिया करणार आहोत. समितीने १ कोटी ७२ लक्ष नोंदी समितीने तपासल्या आहेत. त्यात ११ हजार ५३० नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना दाखले देणार आहोत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...