spot_img
ब्रेकिंगमराठा आंदोलन चिघळले ! आधी आमदाराचे घर जाळले आता नगर परिषद कार्यालयात...

मराठा आंदोलन चिघळले ! आधी आमदाराचे घर जाळले आता नगर परिषद कार्यालयात जाळपोळ

spot_img

माजलगाव / नगर सह्याद्री : माजलगावातील राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे यांबद्द्दल केलेल्या विधानाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर बीडमधील वातावरण चिघळले आहे.

सोमवारी सकाळी आंदोलकांनी आ.सोळंके यांच्या घराची जाळपोळ केली. त्यानंतर आंदोलक आणखी आक्रमक झाले. आंदोलक शहरातील मुख्य मार्गावर आले. तेथे त्यांनी दगडफेक केली.

यावेळी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व पोलिसांचा फौजफाटा शहरात पोहचला. दरम्यान, याच आंदोलकांनी आ. सोळंके यांच्या मालकीच्या शैक्षणिक संस्था आणि सहकारी संस्थांच्या इमारतींवरही दगडफेक केली. टायरही जाळण्यात आले.

तेथून आंदोलक नगर पालिकेत गेले. तेथे त्यांनी जाळपोळ करत दगडफेकही केली. सध्या शहरात तणावाचे वातावरण आहे. सोळंके यांच्या विरोधात आंदोलक घोषणाबाजी करत आहेत. एका कथित घटनेतील ऑडिओ क्लिपनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुढचे ५ दिवस महत्वाचे, पावसाचा जोर वाढणर; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात पावसाचा जोर वाढत असून पुढचे पाच दिवस हवामानाच्या दृष्टीने...

नगर जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याला पिकअपची धडक; वारकरी जखमी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून पंढरपूरकडे जाणार्‍या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या...

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...