spot_img
ब्रेकिंगसंघर्ष योद्धा जरांगे पाटलांचे मोठे आवाहन, "लोकसभा निवडणुकीत.."

संघर्ष योद्धा जरांगे पाटलांचे मोठे आवाहन, “लोकसभा निवडणुकीत..”

spot_img

जालना | नगर सह्याद्री
मराठा आरक्षण विरोधकांना निवडणुकीत असं पाडा, की त्यांच्या पुढच्या पाच निवडणुकीला उभ्या राहिल्या नाही पाहिजेत, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मतदारांना केले आहे. निवडणुकीत आपले उमेदवार नसले, तरी पाडण्यातही आपला विजय असेल, असंही जरांगे यांनी म्हटले आहे. ते जालन्यात बोलत होते.

प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान असल्याने जरांगे हे रुग्णवाहिकेतून त्यांच्या मूळ गोरी गंधारी या गावी आले होते.

लोकशाहीचा हक्क बजावल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.माध्यमांसोबत संवाद साधताना जरांगे म्हणाले, मी मराठा मतदारांना सांगितले होते की कुणालाही मतदान करा. कारण समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. सगेसोयरे अध्यादेशाच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच या बाजूने असणार्‍यांना मराठा समाजाने सहकार्य करायला हवे.

पाडण्यातही आपला विजय
जरी आपण उमेदवार दिलेला नाही, पाठिंबाही दिला नाही. पण पाडण्यातही आपला विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. उभाच राहावे किंवा उमेदवार द्यावा असे काही नाही, पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. यावेळेस पाडणारे बना, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ६ जूनच्या आत आरक्षण दिलं नाही तर आम्ही देणारे बनू विधानसभेच्या मैदानात मी सुद्धा असेल. महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते सारखेच आहेत असे माझा म्हणण्याचा अर्थ होता. पण या दोघांनी मिळून आमचा करेट कार्यक्रम केला, असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रियसीला संपवलं; रेड लाईट परिसरात प्रियकराच भयंकर कृत्य!

मुंबई । नगर सहयाद्री चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या...

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

मुंबई । नगर । सहयाद्री:- देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज...

कोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता, केडगाव परिसरातील रोशन कुमार...

मुला-मुलींच्या संपत्तीवर आई-वडिलांचा हक्क असतो का?, कायदा काय सांगतो!

नगर सहयाद्री वेब टीम:- भारतात मालमत्तेवरून होणारे वाद काही नवीन नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीवरून...