spot_img
ब्रेकिंगअहमदनगर ब्रेकिंग : सैनिक बँकेची प्रारूप यादी प्रासिद्ध ! संस्थापक अण्णा हजारेच...

अहमदनगर ब्रेकिंग : सैनिक बँकेची प्रारूप यादी प्रासिद्ध ! संस्थापक अण्णा हजारेच ठरले अपात्र

spot_img

संस्थापक अण्णा हजारें यांच्यासह ६ हजार सभासद अपात्र

पारनेर | नगर सह्याद्री

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी ४ हजार ७९४ सभासदांची प्रारूप यादी प्रसिध्द करन्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिनांक २९ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.त्यात ८ डिसेंबर २०२३ पर्यंत हरकती स्वीकारने,१८ डिसेंबर हरकतीवर निर्णय देणे व २६ डिसेंबर २०२३ अंतिम यादी प्रसिद्ध करणे असा मतदार यादीचा कार्यक्रम लावला आहे.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे जवळजवळ ११ हजार १९१ सभासद होते. मात्र बँकेने पोटनियमात दुरुस्ती केल्याने त्यातील जवळजवळ ६ हजार संस्थापक सभासद कमी झाले आहेत. ज्या सभासदाचे शेअर्स १ हजार पेक्षा कमी आहेत असे सभासद अपात्र झाले आहेत. तरी सभासदांनी उर्वरित शेअर्स भाग रक्कम बँकेत भरून मतदानास पात्र व्हावे असे अहवान करण्यात आले आहे.

बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे व काही भ्रष्टाचारात गुंतलेले कर्मचार्‍यानीं केलेला गैरव्यवहार झाकावा म्हणून बँकेत स्वताच्या मर्जीतील संचालक मंडळ यावे म्हणून संस्थापक आण्णा हजारेंसह ६ हजार सभासदाला निवडणुकीच्या प्रक्रियेपासून लांब ठेवले असल्याचा आरोप बाळासाहेब नरसाळे व विनायक गोस्वामी यांनी केला आहे.

कर्मचारी पैसे भरून घेणार : सीईओ संजय कोरडे
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून वाढीव शेअर्स संदर्भात ८ डिसेंबर पर्यंत मुदत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या सैनिक सहकारी बँकेमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा सिंहाचा वाटा असुन बँकेचे कर्मचारी अण्णांकडे जावून पैसे भरून घेणार असल्याची माहिती सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी दिली आहे.

सभासदांच्या हक्कासाठी न्यायालयात जाणार : नरसाळे
संचालक मंडळाने उपविधी दुरुस्ती मसुदा सभासदांच्या माहितीसाठी दिलेला नाही, कोविड काळात ऑनलाईन पद्धत्तीने मसुदा मंजुरी मिळवली. कलम २३ प्रमाणे सभासदत्व खुले आहे. मंडळाने केलेल्या उपविधी दुरुस्तीने जुन्या सभासदांच्या हक्कावर गदा आली आहे. संचालकांचा उपविधी दुरुस्तीचा उद्देश व्यापक व सभासद हिताचा नाही. क्रियाशील सभासद अट मंत्रिमंडळाने रद्द केली असल्याने निवडणुकीत विद्यमान सर्व सभासद हे मतदान करण्यासाठी पात्र ठरतील. ६ हजार सभासदांचा प्रतिनिधी म्हणून न्यायालयात जाण्याचा इशारा बाळासाहेब नरसाळे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...