spot_img
ब्रेकिंग'लोकसभा-विधानसभेला मविआचा सुपडा साफ होणार'

‘लोकसभा-विधानसभेला मविआचा सुपडा साफ होणार’

spot_img

तीन राज्यातील विजयाचा भाजपच्या वतीने सावेडीत जल्लोष

अहमदनगर | नगर सह्याद्री-

चार पैकी तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मिदींच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय स्पष्ट संकेत आहे कि येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए ३५० हून अधिक जागा जिंकून २०२४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करतील हे आज सिद्ध झाले आहे.

सर्व विरोधक गेल्या अनेक दिवसांपासून छातीठोकपणे जे पंतप्रधान नरेद्र मोदींबद्दल वाईट बोलत होते त्यांना जनतेच चोख उत्तर दिले आहे. आतातरी त्यांनी मिडिया समोर न येत जनतेत जाऊन झालेल्या चुका सुधाराव्यात, अन्यथा २०२४ साली होणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणर नाही, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे यांनी केले.

राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तिसगढ राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या निर्निवाद बहुमताचा जल्लोष सावेडीत भाजपच्या वतीने विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्रभैय्या गंधे यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आला. ढोल वाजवून, फटाके फोडून व पेढे वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खा.सुजय विखे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी महेंद्रभैय्या गंधे, ज्ञानेश्वर काळे, संगीता खरमाळे, बाबासाहेब सानप, तुषार पोटे, रेखा विधाते, संतोष गांधी, राजू मंगलारप, गोकुळ काळे, संजय ढोणे, प्रताप परदेशी आदींसह मोठ्या संख्यने पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महेंद्र गंधे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने तीन राज्यांमध्ये बहुमत मिळवून जनतेचा विश्वास भाजपवारच आहे हे सिद्ध केले आहे. या विजयामुळे लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल आम्ही जिंकली आहे. आता २०२४ साली होणारी फायनलही आम्हीच जिंकू व नगरमधून डॉ.सुजय विखे यांना पुन्हा खासदार करू.

यावेळी कुसूम शेलार, अशोक जोशी, संपत नलावडे, अविनाश साखला, सचिन कुसळकर, नितीन जोशी, सुमित बटोळे, श्रीकांत फंड, ओमकार काळे, चंद्रकांत पाटोळे, विशाल खैरे, बल्लू सचदेव, सतीश शिंदे, विजय गायकवाड, रियाज कुरेशी, विजय घासे, राहुल बुधवंत, व्यंकटेश बोमादंडी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली; नेमकं काय म्हणाले पहा…

सोलापूर / नगर सह्याद्री - Gopichand Padalkar | Sharad Pawar : ईव्हीएम मशीनच्या विरोधात...

वकिल दांम्पत्य खून प्रकरण; पाच जणांनी रचला ‘ईतक्या’ लाखांसाठी कट; साक्षीदाराने सांगितली आपबीती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲड....

बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात मोर्चा

आ. अमोल खताळ, आ.सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांची उपस्थिती  संगमनेर | नगर सह्याद्री बांगलादेशात काही महिन्यांपासून...

अहिल्यानगर: दहशत कायम! 3 बिबट्यांनी शिकार केली; शेतातील..

जामखेड | नगर सह्याद्री जामखेड शहराचे उपनगर असलेल्या भुतवडा परिसरात बिबट्यांनी गायीवर हल्ला केला असून...