spot_img
अहमदनगरझेडपी पदभरतीचा निकाल जाहीर; 'या' परीक्षा बाकी, किती लागले मिरीट पहा...

झेडपी पदभरतीचा निकाल जाहीर; ‘या’ परीक्षा बाकी, किती लागले मिरीट पहा…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री – 
जिल्हा परिषदेच्या क वर्गातील पदभरती प्रक्रियेत तीन महिन्यांनंतर एका संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने वरिष्ठ सहायक (लेखा) या पदाच्या परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, परीक्षा झालेल्या इतर संवर्गाचे निकाल अद्याप लागले नाहीत, तर आरोग्यसेवकसह अन्य संवर्गाची परीक्षा होणे बाकी आहे. त्या परिक्षा केव्हा होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील क वर्ग प्रवर्गातील पदभरतीची जाहिरात ागस्टमध्ये प्रसिद्ध झाली. यात नगर जिल्हा परिषदेत विविध संवर्गाच्या ९३७ पदांसाठी ४४ हजार ७२६ अर्ज दाखल झाले. ७ ऑटोबर २०२३ रोजी वरिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. पुढील तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने विविध संवर्गाच्या परीक्षा झाल्या.

दरम्यान, सव्वातीन महिन्यांनंतर प्रथम झालेल्या वरिष्ठ सहायक संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. या संवर्गातील ७ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी ६२८ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. आयबीपीएस कंपनीने परीक्षा घेऊन निकाल जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीकडे सुपूर्त केला. त्यानुसार हा निकाल जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यावर आता निवड समितीच्या मान्यतेने कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन त्यानंतर नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.

पाच संवर्गांची परीक्षा बाकी
९२७ पदांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून परीक्षा सुरू आहेत. अखेरची औषध निर्माण अधिकारी पदाची परीक्षा २६ डिसेंबर २०२३ रोजी झाली. आरोग्य सेवक पुरुष (४० टक्के), आरोग्य सेवक पुरुष (५० टक्के), आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक व अंगणवाडी मुख्य सेविका या पाच संवर्गांची परीक्षा होणे अद्याप बाकी आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...

प्रवरेला पूर; अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावांचा संपर्क तुटला

संगमेनर । नगर सहयाद्री:- अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात...

पारनेरकरांना खुशखबर! सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्यास यश; ‘या’ कामांसाठी जलसंपदा विभागाची मंजुरी

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील कुकडी डावा कालव्यावरील पुलांच्या कामांस मंजुरी देण्याचे निर्देश जलसंपदा...