spot_img
अहमदनगरआमदार लंके यांच्या शिरपेचात मानाचा तुरा; मिळाला 'हा' बहुमान, ठरले पहिले आमदार 

आमदार लंके यांच्या शिरपेचात मानाचा तुरा; मिळाला ‘हा’ बहुमान, ठरले पहिले आमदार 

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री –
MLA Nilesh Lanke दोन वर्षाच्या कोरोना काळात हजारो रुग्णांना जीवनदान देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांना द थेम्स इंटरनॅशनल विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

द थेम्स इंटरनॅशनल युनिव्हरसिटी पॅरिस, फ्रान्स यांच्याकडून पारनेर-नगर मतदार संघांचे विधानसभा सदस्य नीलेश लंके यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. आमदार लंके यांनी अनेक जाहीर कार्यक्रमात आपण डॉक्टर नसलो तरी मुन्नाभाई एमबीबीएस असल्याची प्रतिक्रिया वेळोवेळी दिली होती. परंतु आता कोरोना काळातील उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली असून या पुढील काळात ते आमदार डॉ. नीलेश लंके म्हणून ओळखले जाणार आहे.

कोरोना काळात रेस्क्यू ऑपरेशन्समधील योगदानाच्या विशेष समाजसेवेतील कार्यासाठी होनोरीस कॉसा डॉटरेट पदवी प्रदान पॅरिस विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले आमदार म्हणून गौरव करण्यात आला आहे. शनिवारी विद्यापीठाच्या कुलसचिव व पदाधिकार्‍यांकडून ही डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. आ. लंके यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...