अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
किरकोळ वादातून टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. यात तरुण गंभीर जखम झाला आहे. ही घटना बंधन लॉन येथील पार्किंगमध्ये घडली. याप्रकरणी फिर्यादी सतीष अरविंद म्हस्के (रा. सारस नगर, जि. ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार निखिल कोरडे, बापु शिंदे, रवि साळूंके यांच्यासह एका अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार दि (3 मे ) रोजी रात्री रात्री 8 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सतीष म्हस्के बंधन लॉन येथील पार्किंगमध्ये जनरेटर लावत असताना आरोपी निखील कोरडे याने जनरेटरच्या वायर वरुन मोटरसायक घालण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी निखील कोरडे आणि त्याचे साथीदार बापू शिंदे व रवि सोळंके यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली आणि मारहाण केली.
त्याचवेळी आरोपी रवि सोळंके याने कोयत्याने फिर्यादीच्या खांद्यावर वार केला, तर चौथा अनोळखी आरोपीने लाथाबुक्यांनी मारहाण केली. या झटापटीत फिर्यादीची दोन तोळ्यांची सोन्याची चैनही गहाळ झाली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.