spot_img
राजकारणजे अजित दादांना कळलं ते तुम्हाला कळलच नाही..! जयंत पाटलांचा फडणवीस-शिंदेंना टोला..पहा..

जे अजित दादांना कळलं ते तुम्हाला कळलच नाही..! जयंत पाटलांचा फडणवीस-शिंदेंना टोला..पहा..

spot_img

नगर सह्याद्री / नागपूर : राज्य विधिमंडळाच सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, कांदा निर्यातबंदीचा निर्णय, उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी आदींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकरी प्रश्नावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परराज्यात गेले होते. यावरून त्यांनी निशाणा साधला.

काय म्हणाले जयंत पाटील?
गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाला होता. त्यावेळी सत्ताधारी शेजारच्या राज्याच्या निवडणुकीत प्रचारात व्यस्त होते. इतर राज्यांत प्रचार करण्यास आमची हरकत नाही पण इथं आपला संसार फाटला असताना दुसऱ्या राज्यात संसार जोडण्यासाठी मंत्री जातायेत हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने बरं नाही असे ते म्हणाले आहेत.

तुमचा तिकडं विजय झाला, याचा आम्हाला आनंद आहे. पण तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक इमेज असल्यामुळे तुम्हाला जाण्याची आवश्यकता नव्हती. तुम्हाला कोण विचारतो तिकडं?” असा खरपूस सवाल जयंत पाटील यांनी करत ते म्हणाले की, आपले मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री प्रचारासाठी तिकडे गेले पण दुसरे उपमुख्यमंत्री गेले नाहीत असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

त्यांनी असं म्हणताच अजित पवारांनी उत्तर दिलं की मी तिकडे जाऊन काय दिवे लावणार होतो? जे आहे ते मोदींच्या नावावर आहे असं ते म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढत जयंत पाटील म्हणाले की, “मी पण तेच म्हणतोय…जे दादांना कळलं ते तुम्हाला कळलं नाही.” असा खोचक सवाल त्यांनी लगावला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...