spot_img
ब्रेकिंगमहिलांनी राजकारणात पुढे यावे; भाजप नेत्या चित्रा वाघ

महिलांनी राजकारणात पुढे यावे; भाजप नेत्या चित्रा वाघ

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेमार्फत महिलांना सक्षम करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. मोदी सरकारने केवळ महिलांना सक्षम करण्याचे काम केले नाही, तर महिलांवर अत्याचार करणार्‍यांना फासावर लटकविण्याचे कामही केले. आज महिला राजकारणात देखील पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिला राजकारणात देखील पुढे आल्या पाहिजेत असे प्रतिपादन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले.

शहरातील टिळक रस्त्यावरील मंगल कार्यालयात आयोजित शक्तीवंदन महिला स्वयंरोजगार मेळाव्यात चित्रा वाघ बोलत होत्या. या मेळाव्यास धनश्री विखे, जिल्ह्याच्या समन्वयक माधुरी पालवे, अहमदनगर शहर समन्वयक सुधा काबरा, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष प्रिया जानवे, गिता गिल्डा, मालन ढोणे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विनायक देशमुख, सचिन पाररखी, प्रशांत मुथा, पंडित वाघमारे, सविता कोटा ,ज्योती दांडगे, सुनील सकट, संदीप पवार, धिरडे काका, मिनीनाथ मेड पदाधिकारी व महिला मोर्चा पदाधिकारी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे कार्य उल्लेखनीय आहे असे म्हणून उत्स्फूर्तपणे २५ महिलांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. अल्पसंख्याक कार्यकारिणीतील २५ महिलांची नियुक्तीपत्र चित्रा वाघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी धनश्री विखे, अ‍ॅड. अभय आगरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती कुलकर्णी यांनी केले. प्रीतम कुलकर्णी यांनी आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...