spot_img
ब्रेकिंग...तर राजकारणातून संन्यास घेईल! मंत्री विखे पाटील यांचे खासदार राऊत यांना उत्तर

…तर राजकारणातून संन्यास घेईल! मंत्री विखे पाटील यांचे खासदार राऊत यांना उत्तर

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
महानंदची गोरेगाव येथील ५० एकर मोयाच्या ठिकाणची जागा अदानी यांना विकण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पशुसंर्वधन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केला होता. त्याला पालकमंत्री विखे पाटील यांनी उत्तर दिले असून राऊत यांनी हा आरोप सिद्ध करून दाखविला तर राजकारणातून संन्यास घेऊल. अन्यथा राऊत यांच्याविरूद्ध न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी व्यक्त केली.

विखे पाटील यांनी नगरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, मी वारंवार सांगत आलेलो आहे खासदार संजय राऊत यांच्या डोयावर परिणाम झाला आहे. ते जी मुक्ताफळे उधळत आहेत, खरेतर त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. ते कोणत्या ५० एकर जमिनीचे आरोप करत आहेत, हे त्यांनाच माहिती. मी आत्तापर्यंत पुष्कळ सहन केले तसेच काही पथ्य देखील पाळत आलो आहे. परंतु ते महानंदबाबत बेताल वक्तव्य करत असेल तर त्यांनी त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे.

त्यांनी व्यक्तिगत जीवनात काय केले, कोणाचे घर फोडले, हे मलाही सांगावे लागेल. तुम्ही ५० एकरचा दावा करत आहे, तो सिद्ध करावा. सिद्ध न केल्यास त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. पण त्यांनी जर आरोप सिद्ध केले तर मी राजकारणातून संन्यास घेईल, असेही विखे म्हणाले.

खासदार राऊत यांना खरेच तुम्ही लोकांनी (पत्रकार) गांभीर्याने घेऊ नका. हे सुपारीबहाद्दर लोक आहेत. मी जर अशी उपमा वापरली की, हे पिसाळलेल्या कुत्र्यासारखे बोलतात, तर हे सर्वात जास्त होईल. त्यामुळे हे म्हणण्याची विरोधकांनी आमच्यावर वेळ आणू नये. राऊत यांच्या डोयावर परिणाम झाला असून त्यांच्याविरुद्ध आता अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यांनी आरोप सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेईल, असा इशारा त्यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवार शुक्रवारी नगरमध्ये; लंके यांच्या संवाद यात्रेचा समारोप; ‘या’ दिवशी नीलेश लंके अर्ज दाखल करणार!

अहमदनगर | नगर सह्याद्री महाविकास आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या संवाद यात्रेचा...

आमदार निलेश लंकेंसाठी फाळके-कळमकर यांची केमिस्ट्री!; थोरातांचेही बळ! लंके प्रतिष्ठानची स्वतंत्र यंत्रणा निर्णायक…

मतदारसंघात प्रतिष्ठानचे आतापासूनच स्वतंत्र अस्तित्व | संवाद यात्रा निर्णायक टप्प्यावर! सारीपाट / शिवाजी शिर्के लोकसभा निवडणुकीसाठी...

जिल्हा बँकेचा ‘त्या’ शेतकऱयांना दिलासा! घेतला मोठा निर्णय, ‘ते’ व्याज २२ एप्रिलपर्यंत जमा करणार

माजी मंत्री, चेअरमन शिवाजी कर्डीले यांची माहिती अहमदनगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा...

लोकसभेसाठी अर्ज भरण्याचा महुर्त ठरला! खा. विखे, आ. लंके कधी भरणार अर्ज… पहा

अर्ज भरण्यास २५ एप्रिल पर्यंत मुदत | १३ मेला मतदान अहमदनगर । नगर सहयाद्री- लोकसभेच्या अहमदनगर...