spot_img
ब्रेकिंगपुढचे ४ दिवस सूर्य आग ओकणार? 'या' भागात उष्णतेची लाट येणार..

पुढचे ४ दिवस सूर्य आग ओकणार? ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
बदलत्या हवामानामुळे राज्यावर अस्मानी संकट ओढुन आले आहे. कुठे रखरखत्या उन्हाच्या लाटा तर काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच राज्यात येत्या तीन ते चार दिवसात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरापासून उष्ण हवा कोकण, उत्तर- मध्य महाराष्ट्रात येत आहे, तसेच कोरडी माती, एल निनोचा प्रभाव, वाऱ्याच्या खंडिततेचा परिणामामुळे कमाल तापमान वाढत होत आहे. अनेक भागात उन्हाचे चटके जाणवत आहे.

अशातच रायगड, पालघर जिल्ह्यासह मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण राहणार असून पुढील चार दिवसांत कोकण- गोव्यात तसेच राज्याच्या काही भागात चार दिवसात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे महाराष्ट्रतील मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...