spot_img
देशRain Update: थर्टी फर्स्टला विजा चमकणार? हवामान खात्याचा पावसाचा इशारा, नगरसह 'या'...

Rain Update: थर्टी फर्स्टला विजा चमकणार? हवामान खात्याचा पावसाचा इशारा, नगरसह ‘या’ जिल्ह्यात..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
राज्यात दोन ते तीन दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून सकाळी आणि संध्याकाळी गुलाबी थंडीला सामोरे जावे लागत आहे. अरबी समुद्रासह घडलेल्या बदलामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाला असून तापमानात किंचित वाढ झाली आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सरत्या वर्षाला निरोप देताना थर्टी फर्स्टला राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील हवामानात चढ-उतार होत आहे. राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रावर बाष्पयुक्त ढग निर्माण झाल्यामुळे राज्यासह 30 डिसेंबरपासून 2 जानेवारी दरम्यान राज्यात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अहमदनगर, पुणे, जळगाव, कोल्हापूर आणि महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक थंडी आहे. २ जानेवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...