Crime News Today: भरलेल्या घरात भयंकर घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. पती-पत्नीच्या सात जन्माच्या नात्यात एकाच जन्मात मिठाचा खडा पडल्याची घटना घडली आहे. सुखी संसारात घडलेल्या कृत्याची सर्वत्र चर्चा आहे.
उत्तर प्रदेशमधील रामाळा गावात राहणाऱ्या अंकित चे प्रियांकाशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस कटूंब गुण्यागोवींदाने राहत होते. काही महिने उलटल्यानंतर पती-पत्नीमध्ये छोट्या- छोट्या कारणाने वाद सुरु झाले.
वादाचे रूपांतर काही दिवसात हाणामारी पर्यंत पोहचले. एक दिवस पती काम आटपुन घरी आला. कंटाळलेल्या अवस्तेथ असलेल्या पतीने पत्नीकडे चहाची मागणी केली.
दरम्यान पत्नी युट्यूबवर गाणी पाहत होती. ती गाणे पाहण्यात खुप व्यस्त होती. पतीची चहाची मागणी नाकारल्याणारे दोघांमध्ये वाद सुरु झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पतीने- पत्नीला मारहाण सुरु केली.
दरम्यान पत्नीने कुठल्याही प्रकारचा विचार न करता धारदार कात्रीने पतीच्या डोळ्यावर वार केले. त्यामुळे पती रक्तस्त्राव होऊन जमिनीवर पडला. आवाज ऐकून तरुणाच्या वहिनी व मुलांनी तेथे धाव घेत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, तरुणाची पत्नी घरातून पळून गेली होती.