spot_img
अहमदनगरठेवीदारांचे ६० कोटी परत मिळणार? अर्बन बँकेची 'इतक्या' कोटींची कर्ज वसुली, वाचा...

ठेवीदारांचे ६० कोटी परत मिळणार? अर्बन बँकेची ‘इतक्या’ कोटींची कर्ज वसुली, वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
रिझर्व बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे संचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती. दरम्यानच्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये २३ एप्रिलअखेर बँकेच्या थकीत कर्जापैकी १२ कोटी ७८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

याचबरोबर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १७ हजार २०० ठेवीदारांचे २९३.५७ कोटी रुपये डीआयसीजीसीच्या माध्यमातून परत करण्यात आले असून १४ हजारांचे ४८५ ठेवीदारांच्या क्लेम फॉर्मची पूर्तता झालेली असून त्यांचे ६० कोटी रुपये डीआयसीजीसीच्या माध्यमातून लवकरच परत करण्यात येणार असल्याची माहिती बँक प्रशासनाकडून देण्यात आली.

नवीनआर्थिक वर्षामध्ये थकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व थकीत कर्जदारांनी थकबाकीची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.

त्याचबरोबर सर्व खातेदार व ठेवीदार यांनी आपापले केवायसी कागदपत्र नजीकच्या शाखेत जमा करून ठेवी परत मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म देखील लवकरात लवकर भरून द्यावेत असे आवाहन देखील गायकवाड यांनी केले आहे. थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील असल्याचे देखील यावेळी गायकवाड यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...