spot_img
अहमदनगरअजित पवार किंग बनतील की किंगमेकर? आमदार अपात्र झाल्यास 'अशी' बदलणार गणिते

अजित पवार किंग बनतील की किंगमेकर? आमदार अपात्र झाल्यास ‘अशी’ बदलणार गणिते

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रात मागील २ वर्षात २ मोठे राजकीय बंड झाले. त्यात २० जून २०२२ ला शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरेंविरोधात बंड करत भाजपसोबत सत्तेत गेले. वर्षभरापूर्वी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपा-शिंदेसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ते देखील ४० आमदारांसह सत्तेत आले.

महाराष्ट्रात सध्या विधानसभेचे एकूण २८६ आमदार आहेत, त्यात बहुमतासाठी १४४ आमदारांचे पाठबळ हवे. जर शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरले तर आमदारांची संख्या २७० इतकी होईल. अशावेळी बहुमतासाठी १३६ आमदारांची गरज भासेल. सध्या भाजपाकडे १०४, अजित पवारांकडे ४१ तर शिवसेना शिंदे गटाकडे ४० आमदार आहेत. १६ आमदार अपात्र घोषित केले तर शिंदे गटाकडे २४ आमदारांचे संख्याबळ राहील.

त्यामुळे आमदार अपात्र झाले तरी महायुतीच्या सरकारला कुठलाही धोका नाही. परंतु त्यामुळे सरकारमध्ये नेतृत्व बदल होणार हे निश्चित आहे. अजित पवार जेव्हापासून या सरकारमध्ये सहभागी झालेत तेव्हापासून ते मुख्यमंत्री होतील अशी विधाने समोर येत आहेत. बहुमतात असतानाही भाजपाला अजित पवारांची गरज का पडली?

शिंदेंना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री बनवतील अशी चर्चा होऊ लागली. आता जेव्हा विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेचा निकाल सुनावणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार मुख्यमंत्री बनणार की केवळ किंगमेकर राहणार या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...