मुंबई / नगर सह्याद्री : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात काहीवेळात निर्णय येणार आहे. सध्या अनेकांचे लक्ष इकडेच लागले आहे. निकालाला काहीवेळा बाकी असतानाच आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी खळबळजनक दावा केला आहे.
ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार असून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनी कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव करत शिवसेनेचे जायंट किलर ठरले होते. आता त्यांनी खळबळजनक दावा केलाय. दोन दिवसांपूर्वीच सगळा निकाल ठरलाय असा दावा त्यांनी केला आहे.
“मी कामानिमित्त मंत्रालयात आलो होतो, मी हे जबाबदारीने बोलतोय. शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे आमदार मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की, तुम्ही अपात्र होणार. ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार असं वैभव नाईक म्हणाले. “दोन दिवसापूर्वीच निकाल ठरलाय. उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार हे काही लोकांना आधीपासूनच माहित असल्याचा दावा वैभव नाईक यांनी केला.
‘मला नाईलाजाने बोलाव लागतय’
“सुनील प्रभू पक्ष प्रतोद म्हणून वैध ठरले होते. त्यांचा व्हीप पहिल्यादिवसापासून आम्ही मानतोय” असं वैभव नाईक म्हणाले. “हे सर्व वेळकाढूपणाच धोरण होतं. निर्णय त्यांना द्यायचा नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, म्हणून ते निकाल देतायत, आमच्याविरोधात निकाल आहे” असं वैभव नाईक म्हणाले. हे मला नाईलाजाने बोलाव लागतय असं ते म्हणाले.