श्रीगोंदा | नगर सह्याद्री
अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. २२ जानेवारीला प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदीरात विराजमान होतील, या सोहळ्याच्या दिवशी घरासमोर रांगोळी काढून गोड नैवेद्य करत दिवे लावत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन धनश्री सुजय विखे पाटील यांनी केले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून नागरिकांना साखर व डाळीचे वाटप करण्यात येत आहे. दि. ०९ जानेवारी रोजी श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगावमध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम व विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिक्षा शिंदे यांनी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.
गावाच्या विकासासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार बबनराव पाचपुते यांच्या विकास कामांसाठी निधी दिला जाईल अशी ग्वाही धनश्री सुजय विखे पाटील यांनी दिली. यावेळी प्रतिभा पाचपुते, भाजप नेते सचिन कातोरे, ज्ञानेश्वर विखे, विश्वास गुंजाळ, माजी सरपंच रवींद्र शिंदे, उपसरपंच पूजा शिंदे, प्रविण शिंदे, गणेश पानमंद, बाबासाहेब शिंदे, माणिक बापू ढवळे, गणेश ढवळे पाटील, बबन शिंदे, मनीषा बोरगे, राहुल आढाव, अमोल बोरगे, मेजर ढवळे, राम शिंदे, गौतम वाळुंज, रामचंद्र लोंढे, शिवाजी लोंढे, गावातील ग्रामस्थसह पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.