spot_img
राजकारण''जो सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात करतो त्यावर विश्वास का ठेवावा, अजित पवारांचं बंड...

”जो सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात करतो त्यावर विश्वास का ठेवावा, अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी…” शालिनीताई पाटील यांचा घणाघात

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सध्या राजकारणात विविध रंग दिसत आहेत. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित दादा व शरद पवार हे एकमेकांवर टीका करताना दिसत आहे.

काल (२४ डिसेंबर) अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर वसंतदादांच्या पार्श्वभूमीवर घणाघात केला होता. आता त्याच अनुशंघाने शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर घणाघात केला आहे.

काय म्हणाल्या शालिनीताई पाटील
शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये मोठा फरक आहे. शरद पवार यांनी पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी बंड केले होते. तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते असे त्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी हे बंड होते अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केलीये.

२०२४ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील. जो माणूस सख्ख्या चुलत्याचा, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केले त्याचा विश्वासघात करतो त्याच्यावर विश्वास का ठेवावा?, अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही असे त्या म्हणाल्या. अजितदादांसोबत गेलेली माणसं कोणत्या लायकीचे आहेत हे मी आधीच सांगितले असून त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. १०५ कोटींचा भ्रष्टाचार केलेला हा माणूस असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच आम्ही कुणाविरोधात कारस्थान केले नाही. हा माझा आणि माझ्या पतीचा स्वभाव नाही असं शालिनीताईंनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तिघांना घेतलं ताब्यात, मालक फरार, पाच जणांच्या आयडी पासवर्डवर करायचे ‘तसला’ व्यवसाय

शेवगाव । नगर सहयाद्री:- शेवगाव येथील अवैध ऑनलाईन बिंगो जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘हे’ काम केल्यास निलंबन होणार

Government Employee Rules: राज्याच्या महसूल विभागात आता ‘सुट्टीवर चाललोय’ म्हणत मुख्यालय सोडणं सहज शक्य...

सावधान! उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ १४ जिल्ह्यांसाठी अलर्ट

मुंबई । नगर सहयाद्री अवकाळी गेल्यानंतर आता उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील...

‘अवैध’ धंदयावर कारवाईचा धडाका; एमआयडीसी परिसरात छापा

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारू विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका लावला. यात एमआयडीसी परिसरातील...