spot_img
अहमदनगरहनुमान जयंतीच्‍या मुहूर्तावर अर्ज भरण्‍याची नौटंकी करणारे लंके महाविकास अघाडी सरकारच्‍या काळात...

हनुमान जयंतीच्‍या मुहूर्तावर अर्ज भरण्‍याची नौटंकी करणारे लंके महाविकास अघाडी सरकारच्‍या काळात मंदिर बंद असताना गप्‍प का बसले होते?

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री –

हनुमान जयंतीच्‍या मुहूर्तावर अर्ज भरण्‍याची नौटंकी करणा-या निलेश लंके महाविकास अघाडी सरकारच्‍या काळात मंदिर बंद असताना गप्‍प का बसले होते? असा सवाल पारनेर नगर प‍ंचायतीचे माजी नगराध्‍यक्ष विजय औटी यांनी उपस्थित केला.

या संदर्भात प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकात विजय औटी यांनी म्‍हटले आहे की, ज्‍या महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात कोव्‍हीड संकटात जाणीवपुर्वक मंदिर बंद ठेवून भाविकांच्‍या भावनांशी खेळ केला गेला तेव्‍हा निलेश लंके शब्‍दानेही बोलले नाहीत. कोव्‍हीड सेंटरमध्‍ये किर्तनाचे कार्यक्रम घेणारे लंके मंदिर उघडावेत म्‍हणून आग्रही का राहीले नाहीत?

हनुमान चालीसा म्‍हटली म्‍हणून आ.राणा दांम्‍पत्‍यांना जेलमध्‍ये टाकेले तेव्‍हा लंके यांची हनुमान भक्‍ती कुठे गेली होती. पालघर मध्‍ये दोन साधुंची हत्‍या झाली तेव्‍हाही लंके काही बोलले असे आठवत नाही. प्रभू श्रीरामचंद्रांच्‍या अस्तित्‍वावर कोर्टात प्रश्‍न उपस्थित करणा-या कॉग्रेस पक्षाचे पाठबळ घेवून लंके आज उमेदवारी करतात. लंके यांची मुहूर्त पाहून अर्ज भरण्‍याची भूमिका महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांना मान्‍य आहे का? असा प्रश्‍नाही विजय औटी यांनी उपस्थित केला.

हनुमान जयंतीचा मुहूर्त पाहुन अर्ज दाखल करण्‍याची लंके यांची नौंटकी ही केवळ सहानुभूती निळविण्‍यासाठी असली तरी, त्‍यांच्‍या नौंटकीला समाज मुलनार नाही. गदा नाचवली म्‍हणून कोणी पहीलवान होत नाही असा टोला लगावतानाच महाविकास आघडीचा जनाधार संपल्‍यामुळेच आता देव देवतांची आठवण होवू लागील असल्‍याचे औटी यांनी आपल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...