spot_img
अहमदनगरलोकसभेत कोण पाहिजे ? वाळू तस्करांना पोसणारा, बोगस डिग्री घेणारा की आणखी...

लोकसभेत कोण पाहिजे ? वाळू तस्करांना पोसणारा, बोगस डिग्री घेणारा की आणखी कोण?

spot_img

तुमच्या लेकरांना ठरवू द्या, तुमचा खासदार!- खा. सुजय विखे पाटील
पारनेर | नगर सह्याद्री
जनतेला काय हवं आणि काय नको हे तपासूनच मी उपचार करतो आणि कामे मार्गी लावतो. कारण मी डॉक्टरची डीग्री अधिकृतपणे घेतली आहे. बोगस डिग्री मी घेतलेली नाही. चापलुसी करणार्‍यांपैकी तर मी नक्कीच नाही! निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आता लोकसभेत कोणाला पाठवायचे याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मात्र हे करताना तुम्हाला तुमचा खासदार हा वाळू तस्करांना व गुंडांना पोसणारा हवाय की आणखी कोण हे ठरवावे लागणार आहे. यासाठी तुमच्या मुला- मुलींसमोर या निवडणुकीतील सर्व उमेदवारांचे फोटो ठेवा आणि त्यांना विचारा, ‘तुम्हाला कोणासारखं व्हायचंय’! त्यांनी मी सोडून कोणाच्याही फोटोला हात लावला तर आपण खुशाल त्याला मतदान करा! असे खुले आव्हान करतानाच खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेरचे आ. निलेश लंके यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर जहरी टिकास्त्र सोडले.

पारनेर तालुक्यातील बचत गटांना साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच टाकळी ढोकेश्‍वर येथे पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. निलेश लंके यांना मध्यंतरी एका स्वयंसेवी संस्थेने डॉक्टरेट पदवी दिली. त्याचा थेट संदर्भ न देता खा. विखे पाटील यांनी बोगस डिग्री अशी बोचरी टिका केलीे. याशिवाय तालुक्यातील अवैध धंदे आणि त्यात गुंतलेल्या आणि त्यांना पाठीशी घालणार्‍या आ. लंके यांच्या कृतीचाही खा. विखे यांनी थेट समाचार घेतला.


पारनेर तालुका हा पुरोगामी विचारांचा आणि संस्कृतीचा असल्याचा उल्लेख करतानाच तालुक्यातील महिलांना सक्षम करण्याच्या अनुषंगाने आम्ही उचललेले पाऊल महिलांची आर्थिक उन्नती साधणारे ठरणार असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. चापलुसीच्या मुद्यावर लंके यांना अप्रत्यक्षपणे थेट भिडताना खा. विखे म्हणाले की, चापलुसी करुन काहीही होत नाही’! जनतेच्या मनात सारे काही आहे. जनतेनेच हिशेब करुन ठेवला असल्याने मी कधीच म्हणत की, ‘मी फिक्स खासदार आहे, पण भावी म्हणणारे कधीच होत नाहीत’, हे लक्षात घ्या; असा चिमटाही खा. विखे पाटील यांनी काढला.

बचत गटांना साहित्य वाटप करण्याच्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ कोरडे, वसंतराव चेडे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खिलारी, माजी सभापती गणेश शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...