spot_img
राजकारणमहाराष्ट्रात लोकसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? भाजपचे राजकीय गणिते सफल होणार?...

महाराष्ट्रात लोकसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? भाजपचे राजकीय गणिते सफल होणार? पहा ताजा सर्व्हे

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता लोकसभा निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. भाजप सध्या एकहाती सत्ता घेण्यासाठी कंबर कसत आहे. मागील दोन निवडणुकांत स्पष्ट बहुमत भाजपने मिळवले होते.

आता भाजप विजयी हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया या आघाडीत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अशातच आज निवडणुका झाल्या तर देशातील राजकीय चित्र काय असू शकतं,

याबाबत टाइम्स नाऊ आणि इटीजी रिसर्च यांनी संयुक्तपणे एक सर्व्हे केला असून यामध्ये महाराष्ट्रातील जागांबाबतही अंदाज सांगितला गेला आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.

त्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी एनडीएसह विरोधकांच्या इंडिया आघाडीचा असणार आहे. टाइम्स नाऊ आणि ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास ४८ जागांपैकी महायुतीला २७ ते ३१ जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला १७ ते २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसंच इतरांना एक किंवा दोन जागांवर यश मिळेल, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...