spot_img
ब्रेकिंग'मॉन्सून' ची स्वारी कधी येणार? हवामान खात्याने दिले 'मोठे' संकेत, वाचा सविस्तर..

‘मॉन्सून’ ची स्वारी कधी येणार? हवामान खात्याने दिले ‘मोठे’ संकेत, वाचा सविस्तर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
‘मॉन्सून’ चे महाराष्ट्रातील आगमन कधी होणार याकडे बळीराजाच्या नजरा लागल्या आहे. गोव्यात दाखल होत मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला असून १० जूनपर्यंत विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रगती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे.

कालपासून ढगाळ वातावरण होतं, मात्र पहाटे पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नागरिकांना उकड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं दिसत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा आज स्थिर आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकुल परिस्थिती असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्रावर पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची छाया कायम आहे. पुढील चार दिवसात कोकणातील राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी गारांचा पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट

कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगनर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...