spot_img
ब्रेकिंगगतिमान सरकार नागरिकांना केव्हा पाणी पाजणार? आढावा बैठकीत 'यांचा' संतप्त सवाल, पहा...

गतिमान सरकार नागरिकांना केव्हा पाणी पाजणार? आढावा बैठकीत ‘यांचा’ संतप्त सवाल, पहा काय घडलं..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले काम हे रेंगाळलेले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी असून त्याचे निवारण होत नाही. गावात पाईपलाईन टाकण्याचे वाढीव प्रस्ताव गतिमान सरकारकडे पाठवले असून एक वर्षापासून ते मंजूर झाले नाहीत. अनेक ठिकाणी अर्धवट कामे आहेत. हे सरकार लोकांना कधी पाणी पिण्यासाठी देणार असा संतप्त सवाल माजी मंत्री तथा प्राजक्त तनपुरे यांनी येथे केला आहे.

पाथर्डी पंचायत समितीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. याप्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ए. पी. धगधगे, अनिल सानप ,रफिक शेख, अमोल वाघ, राहुल गवळी, ईलियास शेख, पिनु मुळे, अंबादास डमाळे, बिसमिल्ला पठाण आदी उपस्थित होते.

आमदार तनपुरे यांनी तिसगाव, दगडवाडी, मांडवे, कोल्हार आदींसह राहुरी पाथर्डी मतदारसंघातील गावांच्या जलजीवन मिशन योजनेतील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तनपुरे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना मिरी तिसगाव पाणी योजना मंजूर झाली. अनेक गावे पाणी योजनेत समाविष्ट करण्यात आली. त्याला सुमारे १५५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.

तिसगाव मोठे गाव असल्याने याला स्वतंत्र नळ योजना मंजूर केली आहे. सरकार बदलल्यानंतर या योजनेकडे दुर्लक्ष झाले. जुन्या पाणी योजनेची मोठी तूट फूट झालेली आहे. दहा ते बारा दिवसाला लोकांना पाणी मिळत मात्र आज आढावा घेतल्यानंतर या नवीन पाणी योजनेतून अतिरिक्त तासी एक लाख लिटर पाणी मिळणार असून या मतदारसंघातील गावांना चांगल्याप्रकारे दोन दिवसा आड पाणी मिळणार आहे.

तिसगावची असलेली स्वतंत्र पाणी योजना यात काही अडथळे होते ते आज दूर झाले असून येत्या आठवडाभरात तिसगावकरांना पाणी मिळून ही योजना कार्यान्वित होणार असल्याचे यावेळी तनपुरे म्हणाले. अडचणीवर मात करून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे मिरी तिसगाव योजना लवकरच पूर्णत्वास जात असल्याचे समाधान यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...

प्रवरेला पूर; अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावांचा संपर्क तुटला

संगमेनर । नगर सहयाद्री:- अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात...

पारनेरकरांना खुशखबर! सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्यास यश; ‘या’ कामांसाठी जलसंपदा विभागाची मंजुरी

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील कुकडी डावा कालव्यावरील पुलांच्या कामांस मंजुरी देण्याचे निर्देश जलसंपदा...