spot_img
अहमदनगरअहमदनगर: शेतजमीनीचा वाद टोकाला गेला, सख्खा मुलानेच जन्मदात्या बापाचा खून केला! कुठे...

अहमदनगर: शेतजमीनीचा वाद टोकाला गेला, सख्खा मुलानेच जन्मदात्या बापाचा खून केला! कुठे घडली घटना?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाने शेतजमीन नावावर करून देत नाही म्हणून वाद करत खून केल्याची संतापजनक घटना नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावात घडली. गणपत संभाजी कोळगे (वय ८०, रा. जाधव वस्ती, कोऱ्हाळे, ता. राहाता) असे दुर्दैवी बापाचे नाव असून खून करणारा पोटचा नराधम मुलगा अनिल गणपत कोळगे (वय ५३) फरार झाला आहे.

अधिक माहिती अशी : मुलगा अनिल गणपत कोळगे (वय ५३) याने शेतजमीन त्याच्या नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून वडील गणपत संभाजी कोळगे (वय ८०, रा. जाधव वस्ती, कोऱ्हाळे, ता. राहाता) यांना लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी अनिल कोळगे हा फरार झाला आहे.

मयत गणपत कोळगे यांचा मृतदेह लोणी येथील प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी नातेवाईक अमोल विश्वनाथ साळवे (रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवेंद्रजी, नगरमध्ये बीडीओच लाचखोर निघाला हो!

मिनी मंत्रालय झाले अधिकाऱ्यांचे चरण्याचे कुरण | आनंद भंडारी यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषद- पंचायत...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार बिनव्याजी कर्ज..

मुंबई । नगर सहयाद्री राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मोठा दिलासा...

केडगावात विजेचा लपंडाव! माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला इशारा; ‌‘वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा… ’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगराचा गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे...

चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग! निळवंडेत ३६ टक्के तर भंडारदरा धरणात ‘इतका’ पाणीसाठा

अकोले | नगर सह्याद्री भंडारदरा धरण परिसरात गत चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने...