spot_img
राजकारणमी मुख्यमंत्री झालो की, त्यानंतर मग.. संभाजीराजेंच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

मी मुख्यमंत्री झालो की, त्यानंतर मग.. संभाजीराजेंच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

spot_img

नगर सह्याद्री टीम : मागील काही महिन्यांपासून राजकरणात अनेक चढ उतार आपण पाहतोय. तसेच अनेक राजकीय नेत्यांचे मुख्यमंत्री पदाबाबतचे बॅनरही पाहतोय. अनेक लोक सध्या मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. परंतु आता सध्या संभाजीराजे छत्रपती यांच्या एका व्यक्तव्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

राज्यात मराठा आरक्षणासह धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यातच अनेकविध मुद्द्यांवरून राज्यात आंदोलने सुरू आहेत. सारथीच्या प्रश्नांसंदर्भात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट संभाजीराजे यांनी घेतली.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध मागण्या व समस्या मांडल्या. यानंतर संभाजीराजेंनी घेतलेली सारथी आंदोलकांच्या भेटीदरम्यान केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

आंदोलकांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करताच, मला मुख्यमंत्री करा, चुटकीत प्रश्न सोडवतो, असे विधान संभाजीराजे यांनी केले. संभाजीराजे यांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत संभाजीराजे यांनी पहिल्यांदा विधान केलेले नाही.

यापूर्वीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा संभाजीराजे यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, या आंदोलनाला संभाजीराजे यांनी भेट देऊन दिवाळीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी आमचे प्रश्न सुटले, तर आम्ही आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! ‘जीवनसाथी डॉट कॉम’ बनावट आयडी, पुढे घडलं असं काही..

मुंबई । नगर सहयाद्री:- हनी ट्रॅपचा वापर करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून महिलांना...

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

मुंबई। नगर सहयाद्री:- महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक...

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...